Raj Thackeray Maharashtra Shaheer Teaser Launch Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raj Thackeray: राज ठाकरेंचं मिश्किल भाष्य, “आमची अवस्था दहावी नापास विद्यार्थ्यांसारखी झाली कारण...”

केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा टीझर आज सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. हा दमदार टीझर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते लाँच झाला.

Chetan Bodke

Raj Thackeray Maharashtra Shaheer Teaser Launch: केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा टीझर आज सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. या शेअर केलेल्या टीझरमध्ये महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तीचे दर्शन घडते. हा दमदार टीझर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते लाँच झाला.

महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहीर सिनेमा २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

२०२३ हे वर्ष महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांचे नातू दिग्दर्शक केदार शिंदे यांनी हा वसा हाती घेऊन चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.

टीझर प्रदर्शनातच्या वेळी राज ठाकरे माध्यमांसोबत बोलताना म्हणाले, “शाहीर आणि बाळासाहेब यांची फार जुनी मैत्री होती. मी शाहीरांना लहानपणापासून पाहत आलोय. बाळासाहेबांना बाळ म्हणणाऱ्या काही मोजक्या लोकांमध्ये शाहीर साबळेंचा क्रमांक. या सिनेमाचं संगीत फक्त अजय- अतुल यांनी करणे शक्य होते, बाकी कोणी नाही.”

राज ठाकरे पुढे खास मिश्किल अंदाजात म्हणतात, “हा सिनेमा २८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे, त्यावेळी केदार मी नाहीये. मी बाहेरगावी जात आहे. कारण निवडणूका सध्या मार्च- एप्रिल दरम्यान किंवा ऑक्टोबर अशा होत असतात. त्यामुळे आमची अवस्था सध्या दहावी नापास विद्यार्थ्यांसारखी झाली आहे. अशा अंदाजात राज ठाकरे यांनी महाराष्ट्र शाहीर सिनेमाला शुभेच्छा दिल्या आणि सर्वांशी संवाद साधला.”

सिनेमाच्या टीझरमध्ये अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या दमदार भूमिकेत दिसणार असून शाहिरांची धगधगती गाथा अंकुश चौधरीने या सिनेमातून जिवंत करण्याचं काम केले आहे. या सिनेमात केदार शिंदेंची लेक सना शिंदे सुद्धा दिसणार आहे. सिनेमात मृण्मयी देशपांडे लता मंगेशकरांची भूमिका साकारत असून ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडे सिनेमात झळकणार आहे. अजय- अतुल आणि केदार शिंदे हे त्रिकूट अनेक वर्ष एकत्र काम केले असून सिनेमात शाहीर साबळेंची श्रवणीय गाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोलीच्या अतिदुर्गम लष्कर, गोपणार गावांना वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट

7 स्वीकृत नगरसेवकपदासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन अन् धक्काबुक्की; महापालिकेत गोंधळ

Maharashtra : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दडलेली 'ही' ७ स्वर्गासारखी सुंदर गावे, सुट्टीत एकदा नक्की फिरून या

Wednesday Horoscope: ‘या’ ४ राशींच्या नशिबात मोठा बदल; धनलाभासह मिळणार खास संधी!

Mumbai Crime : अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आला, अन् पैशांसाठी चोर झाला; सीसीटीव्हीने बिंग फुटले

SCROLL FOR NEXT