Aathvani Trailer Out Saam TV
मनोरंजन बातम्या

Upcoming Marathi Movie Aathvani Trailer Out : जुन्या आणि नव्या पिढीची अनोखी प्रेमकथा उलघडणाऱ्या ‘आठवणी’चा ट्रेलर प्रदर्शित

Aathvani Trailer Released : दोन पिढ्यांची प्रेमकथा या चित्रपटातून उलगडणार आहे.

Pooja Dange

Mohan Agashe - Suhas Joshi Movie Trailer Out : कथेच्या शोधात निघालेला तो आणि या प्रवासात त्याला गवसलेली भावनिक गुंतागुंत. ओढ आणि त्यातून साकारलेली प्रेमकथा म्हणजे ‘आठवणी’! या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांना या चित्रपटाच्या कथेविषयी उत्सुकता होती. चित्रपटच टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता प्रतिक्षा संपली आहे.

चित्रपटाच्या पोस्टरवर ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, सुहृद वार्डेकर आणि वैष्णवी करमरकर यांचे फोटो बघूनच चित्रपट नक्की काय असेल याविषयी प्रेक्षक उत्सुक होते. (Latest Entertainment New)

एका कथेच्या शोधात निघालेला लेखक, त्याला हवी तशी गोष्ट न सापडल्याची तळमळ आणि अशातच त्याच्या हाती लागलेलं एक खास पत्रं... या पत्रामुळे त्याचं, त्याच्या जोडीदाराचं बदलून गेलेलं आयुष्य. हाती लागलेल्या पत्रामुळे दूर गेलेल्या खऱ्या प्रेमवीरांच्या शोध आणि या सगळ्या प्रवासात त्याला मिळालेलं समाधान... याचं चित्र उलगडून दाखवणारा हा ट्रेलर आहे.

दोन पिढ्यांची प्रेमकथा या चित्रपटातून उलगडणार आहे. एकीकडे दिग्गज कलाकार आणि दुसरीकडे नवोदित कलाकारांचे सुंदर असे समीकरण या चित्रपटात जुळून आलेले आहे. याशिवाय अभिनेता निनाद सावंत साहाय्यक भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील पत्रातून होणारा संवाद अगदी वेगळ्या प्रकारे दिग्दर्शक सिद्धांत सावंत यांनी आपल्यासमोर मांडला आहे. (Marathi Movie)

मिनाश प्रॉडक्शन प्रस्तुत आणि सिद्धांत सावंत व अशोक सावंत निर्मित ‘आठवणी’ हा चित्रपट ७ जुलैला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Famous Singer : "हाच माझा जोडीदार..."; प्रसिद्ध गायिकेने Live कॉन्सर्टमध्ये दिली प्रेमाची कबुली, होणाऱ्या नवऱ्यासोबत केला रोमँटिक डान्स |VIDEO

Beed Crime: बीड हादरले! मध्यरात्री रक्तरंजित थरार, चाकूने सपासप वार करत तरुणाला जागीच संपवलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या 3 दिवसांत खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता?

Accident News : फ्लायओव्हरवर भीषण अपघात! कारची दुचाकीला जोरदार धडक; ४ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT