Natasa Stankovic SAAM TV
मनोरंजन बातम्या

Natasa Stankovic : मुलाला आई-वडील दोघांचं प्रेम हवं, घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याच्या एक्स बायकोचं वक्तव्य

Natasa Stankovic Talk On Life : हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटानंतर नताशा पहिल्यांदाच आपल्या वैयक्तिक आयुष्यावर बोलली.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic ) आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) आता विभक्त झाले आहेत. दोघही अनेक वेळापासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

नताशा आणि हार्दिक पांड्या वेगळे झाले असले तरी आपल्या मुलाचा ते एकत्र सांभाळ करत आहे. घटस्फोटानंतर नताशा भारताबाहेर गेली होती. तिने आपल्या मुलांसोबत एक ट्रिप प्लान केली होती. कोर्टाने नताशाला मुलाचा ताबा दिला आहे. घटस्फोटानंतर आता नताशाने मौन सोडलं आहे.

एका मिडिया मुलाखतीत नताशाने सांगितले की, "मी आता पुन्हा एकदा माझे काम सुरू करणार आहे. अनेकांना वाटते की मी अगस्त्यसोबत सर्बियाला परत जाईन पण असे नाही आहे. मी भारतातच राहणार आहे. मी परत कशी जाऊ शकते? मला एक मूल आहे. त्याची शाळा मुंबईतच आहे. त्याचा जन्म येथे झाला आहे. त्यामुळे आम्हाला येथेच रहावे लागणार आहे. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. अखेर काही झाले तरी त्याचे सर्व कुटुंब येथेच राहत आहे. मी, हार्दिक आणि आमचा मुलगा अजूनही एक कुटुंब आहोत. कारण आता अगस्त्याला त्याचे आई आणि बाबा दोघांचीही गरज आहे. मी 10 वर्षांपासून दरवर्षी सर्बियाला जात आहे."

पुढे नताशा म्हणाली की, "मला माझ्या मुलासोबत राहायला खूप आवडते. मी प्रत्येक परिस्थितीत त्याच्यासोबत असेल. अगस्त्य माझ सर्वस्व आहे. अनेक वेळा मी गप्प राहणे पसंत केलं आहे. आज मला आणि माझ्या मुलाला कोणी हात लावू शकत नाही."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Tourism : एक दिवसाची भन्नाट ट्रिप! फिरा कल्याणजवळची ५ बेस्ट मॉन्सून पिकनिक स्पॉट्स

किडनी स्टोन की युरीन इन्फेक्शन? दोघांमधील फरक कसा ओळखायचा?

रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी प्यायल्याने काय होते? 5 फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल

देवेंद्र फडवणीस दिल्लीत जाण्याच्या चर्चेनंतर भाजपच्या बड्या नेत्याची बॅनरबाजी, देवा भाऊंच्या नेतृत्वात...;

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश; वसतिगृहांचा शासन निर्णय अखेर रद्द!

SCROLL FOR NEXT