MLA Satyajeet Tambe Viral Post  Saam TV
मनोरंजन बातम्या

Onkar Bhojane Viral Video: आमदार सत्यजीत तांबेंनाही ओंकार भोजनेच्या कवितेची भुरळ, 'हौस आकाशी उंच उडायची...' पोस्ट व्हायरल

एका कार्यक्रमात ओंकारने कविता सादर केली आहे.

Pooja Dange

MLA Satyajeet Tambe shares Onkar Bhijane's Poem: 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या विनोदी मालिकेने संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर देशातील कानाकोपर्यातील अनेकांना वेड लावले आहे. या मालिकेतील अनेक कलाकार घराघरात पोचले आहेत. मालिकेत पात्र आपल्यातील आहेत असे अनेकदा आपल्याला वाटते. ही पात्र साकारणारे कलाकार देखील आपलंसं झाले आहेत.

त्यातील एक कलाकार म्हणजे ओंकार भोजने. ओंकार सध्या आपल्याला 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या मालिकेत दिसत नसला तरी त्याची चर्चा मात्र सर्वत्र आहे. ओंकारचा मुख्य भूमिकेतील पहिला चित्रपट 'सरला एक कोटी' काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये देखील त्याने उत्तम काम केले आहे.

परंतु ओंकारची चर्चा होण्यामागचं कारण वेगळं आहे. त्याची कोणत्या चित्रपटामुळे किंवा मालिकेमुळे चर्चा होत नाहीये. तर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्याची चर्चा होत आहे.

त्याच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ओंकार कविता म्हणत आहे. 'तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची...' अशा या कवितेतील ओळी आहेत. एका कार्यक्रमात ओंकारने ही कविता सादर केली आहे. ओंकाराच्या दमदार आवाजातील ही सुंदर कविता ऐकू प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्ट्या वाजवून त्याला दाद दिली आहे.

ओंकार हा व्हिडिओ अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसेच 'तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची..., कमाल गायलंस मित्रा, ओंकार भोजने !' असे कॅप्शन देखील या व्हिडिओला दिले आहे. या व्हिडिओ ओंकारच्या कौतुक करणाऱ्या अनेक कमेंट येत आहेत.

'प्रेरणा देऊन गेले दादा खूप सुंदर', 'खूप छान कविता ....... शब्द,बोल,भावना खूप छान ...!!!', 'जितका उत्कृष्ट अभिनेता तितकाच उत्तम गायक...तरुण पिढी साठी आदर्श' अशा कमेंट नेटकरी ओंकारचे कौतुक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रानडुकरांच्या हैदोसामुळे शेतकऱ्याचे उभे केळीचे पीक जमीन दोस्त

डायबिटीजमध्ये किवी खावा की नाही? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'हे' फळ ठरेल फायदेशीर

RCB vs GT IPL 2026 Final: कोण जिंकणार आयपीएल २०२६चा कप? RCB आणि GT मधील महसंग्राम कुठे, केव्हा आणि कसा पहाल?

Maharashtra Farmer Loan : १० दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, राज्य सरकारची मोठी घोषणा

Actress Bath Video Leak: अभिनेत्रीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ लीक', टिव्ही शोमध्ये घडला भयानक प्रकार

SCROLL FOR NEXT