Mission Chulbul Singham SAAM TV
मनोरंजन बातम्या

Mission Chulbul Singham : चुलबुल अन् सिंघमचं नवं मिशन, रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात कोण कोण झळकणार?

Salman Khan In Mission Chulbul Singham : 'सिंघम अगेन' नंतर आता रोहित शेट्टीच्या नवीन चित्रपटाची घोषणा झाली आहे. या चित्रपटाचे अपडेट जाणून घ्या.

Shreya Maskar

सध्या बॉक्स ऑफिसवर 'सिंघम अगेन'ची (Singham Again) चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) सिंघम फ्रेंचायझीच्या ॲक्शन चित्रपटांची प्रेक्षक नेहमी आतुरतेने वाट पाहत असतात. नुकताच 1 नोव्हेंबरला 'सिंघम अगेन' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट दिवाळीच्या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रिलीज झाला आहे. या चित्रपटाने तीन दिवसात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

'सिंघम अगेन' या चित्रपटात तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. यात अजय देवगण, करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार आणि सलमान खानने (Salman Khan) कॅमिओ देखील केला आहे. 'सिंघम अगेन' मध्ये चुलबुल पांडेच्या एन्ट्रीने चाहत्यांना प्रचंड आनंद झालेला पाहायला मिळत आहे. 'सिंघम अगेन'च्या रिलीज नंतर आता रोहित शेट्टीने अजून एक चाहत्यांना दिवाळीचे गिफ्ट दिले आहे.

'सिंघम अगेन' चित्रपटाच्या शेवटी रोहित शेट्टीने सलमान खानसोबतच्या आगामी सिंघम चित्रपटाची घोषणा केली आहे. या बातमीमुळे चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. आता सिंघम फ्रेंचायझी कॉप युनिव्हर्सच्या आगामी चित्रपटात भाईजान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सलमानच्या नवीन चित्रपटाचे नाव 'मिशन चुलबुल सिंघम' असे आहे. 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या शेवटी सलमान खानच्या नवीन चित्रपटाची हिंट रोहित शेट्टीने दिली आहे. 'मिशन चुलबुल सिंघम' (Mission Chulbul Singham) चित्रपटाकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. या चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त अजून कोण कलाकार पाहायला मिळणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

'मिशन चुलबुल सिंघम' हा चित्रपपट सलमान खान आणि रोहित शेट्टी यांचा पहिला एकत्र चित्रपट असणार आहे. भाईजानच्या 'दबंग' चित्रपटातील 'चुलबुल पांडे'ची भूमिका चाहत्यांना खूप आवडली. आता सलमान खान पुन्हा एकदा पोलिसांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

SCROLL FOR NEXT