Sini Shetty Crying Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Miss World 2024 स्पर्धा हारल्यानंतर खूप रडली Sini Shetty, इमोशनल VIDEO व्हायरल

Priya More

Sini Shetty Got Emotional:

71 व्या मिस वर्ल्डच्या (Miss World 2024) विजेत्याची घोषणा शनिवारी रात्री करण्यात आली. संपूर्ण जगाचे याकडे लक्ष लागले होते. अखेर झेक रिपब्लिकच्या क्रिस्टीना पिजकोव्हा मिस वर्ल्डची विजेती ठरलीय. मिस वर्ल्डचे मुकुट क्रिस्टीना पिजकोव्हाच्या डोक्यावर घालण्यात आले. या स्पर्धेत 120 देशांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या सर्व स्पर्धकांमधून क्रिस्टीना पिजकोव्हाने हा किताब आपल्या नावावर केला आहे. तर या स्पर्धेत सिनी शेट्टीने भारताचे प्रतिनिधित्व केले. पण तिला विजेतेपद मिळवण्यात यश आले नाही. ही स्पर्धा हारल्यानंतर सिनी शेट्टी (Sini Shetty) खूपच इमोशनल झाली आणि रडू लागली. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिस वर्ल्ड 2024 या स्पर्धेमध्ये सिनी शेट्टीने टॉप 8 मध्ये स्थान मिळवले. पण तिला टॉप 4 मध्ये स्थान मिळवता आले नाही. पराभवानंतर सिनी शेट्टीला अश्रू अनावर झाले. सिनी शेट्टी यंदाचा मिस वर्ल्डचा किताब जिंकण्यात अपयशी ठरली. या पराभवावर सिनी खूपच इमोशनल झाली आणि ती रडू लागली. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सिनी आपल्या कुटुंबातील सदस्याला मिठी मारून रडताना दिसत आहे.

ही स्पर्धा हारल्यानंतर सिनी शेट्टी आपल्या आईला मिठी मारून रडते. त्यावेळी तिचे कुटुंबीय तिला धीर देण्याचा प्रयत्न करतात. यावेळी सिनी शेट्टी टिश्यूने डोळे पूसताना दिसत आहे. सिनीला रडताना पाहून कोणालाही वाईट वाटेल. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सिनी तिच्या कुटुंबीय आणि मित्रांना भेटताना दिसत आहे. रडत असताना देखील सिनी तिच्या कुटुंबाची काळजी घेताना दिसत आहे. पण यावेळी सर्वजण तिला हसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील दिसत आहे.

सिनीने मिस वर्ल्डचा किताब जिंकला नसला तरी तिने याआधीही अनेकवेळा आपल्या आई-वडिलांना अभिमान वाटला असं काम केलं आहे. सिनी शेट्टीने 'मिस इंडिया 2022' मध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले. त्यादरम्यान तिने 'मिस इंडिया'चा ताज जिंकला होता. मिस वर्ल्डच्या ग्रँड फिनालेमध्ये सिनी शेट्टीही टॉप 8 मध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरली. फक्त तिला टॉप 4 मधून बाहेर पडावे लागले. त्यामुळे ती या स्पर्धेच्या विजेत्यासाठीच्या स्पर्धेतून बाहेर पडली.

सिनी शेट्टी मूळची कर्नाटकची असून ती भारतीय मॉडेल आहे. सिनी राजघराण्यातील आहे. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी सिनीने मिस इंडियाचा किताब पटकावला होता. सिनी शेट्टी चार्टर्ड अकाउंटंटचे शिक्षण घेत आहे.त्याशिवाय सिनी एक उत्कृष्ट भरतनाट्यम डान्सर देखील आहे. सिनीने निंबुडा या गाण्यावर भरतनाट्यम नृत्य करून माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चनला ट्रिब्यूट केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

Maharashtra News Live Updates: दोन हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

Mahayuti News : महायुतीच्या पहिल्या यादीचा मुहूर्त ठरला, 40 उमेदवारांची घोषणा?

SCROLL FOR NEXT