Mirzapur 3 Poster Release Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mirzapur 3 Poster: 'मिर्झापूर 3'चं पोस्टर रिलीज, मात्र मुन्ना भैय्याचे चाहते नाराज; कारण काय?

साम टिव्ही ब्युरो

Mirzapur 3 Poster Release:

गेल्याने अनेक दिवसांपासून चाहते ज्याची वाट पाहत होते. तो दिवस अखेर आला आहे. चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून 'मिर्झापूर 3'चे पोस्टर रिलीज झाले आहे. जेव्हापासून अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने याची घोषणा केली होती की, 19 मार्च रोजी काहीतरी मोठे घडणार आहे. तेव्हापासून चाहते या सीरीजची अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुक होते.

मंगळवारी प्राइम व्हिडिओने 2024 मध्ये येणाऱ्या शो आणि चित्रपटांची माहिती झहीर केली आहे. सोशल मीडियावर जसजशा पोस्ट येऊ लागल्या, तसतशी लोकांची उत्सुकता वाढत होती. मात्र प्रत्येकजण 'मिर्झापूर' सीझन 3 ची वाट पाहत होता. यातच मिर्झापूर सीझन 3 पोस्टर समोर आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिर्झापूर सीझन 3 च्या रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये सिंहासनाला आग लागल्याचं दिसत असून त्याच्या शेजारी एक बॉडी पडलेली दित आहे. सीरीजचे पोस्टर पाहता सत्तेसाठीची ही लढाई सीझन 3 मध्ये पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. सोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'सिंहासनावर आपला दावा मांडत असताना, गुड्डू आणि गोलू एका नवीन स्पर्धकाविरुद्ध उभे आहेत. ते या आगीतून जातील की बाहेरील शक्ती सत्तेचे हे सिंहासन कायमचे नष्ट करतील?'' (Latest Marathi News)

या सीझनच्या मुख्य कलाकारांमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुग्गल, विजय वर्मा, हर्षिता गौर, अंजुमन शर्मा, प्रियांशू पैन्युली, शीबा चड्ढा, राजेश तैलंग आणि मनुरिषी चड्ढा यांचा समावेश आहे. पोस्टरसोबत रिलीज डेटबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच कास्टिंगमध्ये मुन्ना भैय्या म्हणजेच दिव्येंदू शर्माचे नाव नाही. यामुळे लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले नेटकरी?

अ‍ॅमेझॉन प्राइमच्या पोस्टवर कमेंट करत एका युजरने लिहिलं आहे की, 'तारीख कोण सांगणार?' एका यूजरने लिहिले की, 'मुन्ना भैयाला जिवंत करा.' एका यूजरने विचारले, 'पुढच्या वर्षी तारीख सांगणार का?' तर आणखी एकाने म्हटलं आहे की, 'तारीख पाण्यात गेली.' दुसऱ्याने लिहिले, 'तारीख लवकर जाहीर करावी.' एकाने 'दिव्येंदूचे नाव कलाकारांच्या यादीत का नाही?', असं विचारलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

SCROLL FOR NEXT