Mika Singh  Saam Tv
मनोरंजन बातम्या

मिका सिंगने निवडली नवरीबाई; कोण आहे आकांक्षा पुरी?

मिका सिंहला मिळाली आयुष्यभराची जोडीदार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - गेल्या दोन महिन्यांहून मिका सिंगचा स्वयंवर या शो चर्चेत होता, अखेर आता गायकाला त्याची जोडीदार मिळाली आहे. अभिनेत्री आकांक्षा पुरी 'स्वयंवर : मिका दी वोटी' या रिअॅलिटी शोची विजेती ठरली आहे. मिका सिंगसोबत (Mika Singh) लग्न करण्यासाठी आकांक्षा पुरीने शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. आकांक्षा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे. आता तिने हा शो जिंकल्याने लवकरच मिका सिंह तिच्यासोबत लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे.

हे देखील पाहा -

सर्वांनी शोमध्ये वधूच्या पेहरावात मिका सिंहला त्यांच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. टॉप 3 मध्ये आकांक्षा पुरी व्यतिरिक्त फक्त पंजाबची नीत महल आणि कोलकाताची प्रांतिका दास होत्या. मात्र, आकांक्षा पुरीने अंतिम फेरीत दास आणि नीत यांना पराभूत करून मिकाच्या हृदयात स्वतःची जागा निर्माण केली.

आकांक्षा-मिकाची जुनी ओळख

या शोमध्ये तीनही स्पर्धकांसाठी हळदी, मेहंदी आणि संगीत यांसारखे विधी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शेवटी मिकाने निर्णय घेतला आणि त्याची मैत्रिण आकांक्षा पुरी हिची जीवनसाथी म्हणून निवड केली. शोमध्ये प्रवेश केल्यानंतर आकांक्षाने सांगितले होते की ती मिका सिंगची खूप चांगली मैत्रीण आहे. पण मिकाला इतर मुलींच्या जवळ येताना पाहून तिला हेवा वाटू लागला. त्यानंतर तिला मिकाबद्दलच्या तिच्या भावना समजल्या आणि आकांक्षा पुरीने कोणाचीही पर्वा न करता मिका की दुल्हनिया बनण्यासाठी तिच्या स्वयंवरमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Muncipal Elections : अकोल्यात महायुतीच्या जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला ठरला, कोणाच्या वाट्याला किती जागा? वाचा

भाजपनं केरळमध्ये रचला इतिहास, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर विराजमान; विधानसभा निवडणुकीआधीच मोठे संकेत

Maharashtra Live News Update: वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का

त्यांना आता विशिष्ट लोकांचे जोडे चाटायाचे, रशीद मामूंच्या पक्षप्रवेशावरून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल|VIDEO

Hair Care : केसांना सतत काळी मेहंदी लावल्याने काय नुकसान होते? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT