Metro In Dino Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Metro In Dino Collection : सारा अली खानचा 'मेट्रो इन दिनों' फ्लॉप की हिट? चौथ्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Metro In Dino Box Office Collection Day 4 : सारा अली खानच्या 'मेट्रो इन दिनों' चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. चित्रपटाने चौथ्या दिवशी किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.

Shreya Maskar

चार अनोख्या प्रेम कथा असलेला 'मेट्रो इन दिनों' (Metro In Dino) चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजन करत असला तरी चित्रपटाला हवा तसा चांगला प्रतिसाद मिळत नाही आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. 'मेट्रो इन दिनों' ने वीकेंडला चांगली कमाई केली. मात्र सोमवारच्या कामाईत घट झालेली पाहायला मिळत आहे. हा चित्रपट 4 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'मेट्रो इन दिनों' हा चित्रपट 'लाइफ इन अ मेट्रो' या 2007 साली रिलीज झालेल्या चित्रपटाचा सीक्वल आहे. 'मेट्रो इन दिनों' चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासू यांनी केले आहे. 'मेट्रो इन दिनों' हा एक रोमँटिक ड्रामा आहे. चित्रपटाला चांगला प्रतिसाद जरी नसला तर चित्रपटातील गाणी सुपरहिट झाली आहेत. सोशल मीडियावर गाण्यांनी धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने चौथ्या दिवशी सोमवारी किती कोटी कमावले, जाणून घेऊयात.

'मेट्रो इन दिनों' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4

  • दिवस पहिला - 3.5 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 6 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 7.25 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 2.5 कोटी रुपये

  • एकूण - 19.25 कोटी रुपये

'मेट्रो इन दिनों' बजेट

'मेट्रो इन दिनों' चित्रपटाचे कलेक्शन दिवसेंदिवस असेच कमी होत राहीले तर चित्रपट बजेट तरी वसूल करेल का? असा प्रश्न उभा राहील. मीडिया रिपोर्टनुसार, 'मेट्रो इन दिनों' चित्रपटाचे बजेट 85 कोटी रुपये आहे. 'मेट्रो इन दिनों' चित्रपटात सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, कोंकणा सेन शर्मा, फातिमा सना शेख, पंकज त्रिपाठी, अली फजल, अनुपम खेर आणि नीना गुप्ता हे तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT