Mauritius Theatre Get Threatening Mail Saam Tv
मनोरंजन बातम्या

The Kerala Story Controversy: चित्रपटच शो बंद करा नाहीतर... द केरला स्टोरी चित्रपट दाखवणाऱ्या थिएटरला ISIS ची धमकी

Mauritius Theatre Get Threatening Mail: दहशतवादी संघटना ISIS ने ई-मेल पाठवून थिएटर्सना धमकी दिली आहे.

Pooja Dange

Mauritius Theatre Get Threatening Mail From ISIS : 'द केरला स्टोरी' हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या चित्रपटाला भारतातच नाही तर परदेशात देखील विरोध झाला. असे असले तरी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामे केली. 'द केरला स्टोरी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 225 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

भारतातील अनेक राज्यात या चित्रपटाला विरोध झाला. चित्रपटाच्या शोला परवानगी देण्यात आली नाही. मॉरिशसमधील एक प्रकरण नुकतेच समोर आले आहे. येथे ज्या थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवला जात आहे, त्यांना धमक्यांचे मेल येत आहेत. दहशतवादी संघटना ISIS ने ई-मेल पाठवून हा थिएटर्सना धमकी दिली आहे. चित्रपटाचे शो थांबवले नाही, तर ते थिएटर उडवून देतील, असे या मेलमध्ये म्हटले आहे. (Latest Entertainment News)

निर्माते विपुल शहा यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. चित्रपटाबाबतही तणावाचे वातावरण आहे. यातच चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने रागाच्या भरात चित्रपटाची मुख्य अभिनेत्री अदा शर्माचा वैयक्तिक संपर्क क्रमांक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

मॉरिशस थिएटरने ISIS ने पाठवलेला ई-मेल विपुश शहा यांना पाठवला आहे. उद्या आम्ही एमसिन संपवून टाकू, अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. आम्ही या सिनेमा हॉलमध्ये (एमसिन) बॉम्बस्फोट करणार आहोत आणि उद्या सर्वांना एक चांगला चित्रपट दाखवू. शुक्रवारी जेव्हा द केरला स्टोरी थिएटरमध्ये दाखवला जाईल तेव्हा एमसिनमध्ये बॉम्बस्फोट होईल .

'द केरला स्टोरी'ची सध्या जगभरात चर्चा होत आहे. ISIS हिंदू, ख्रिश्चन अशा विविध धर्मांच्या मुलींना जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर कसे करतात हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. मग त्यांचा अतिरेकी म्हणून वापर केला जातो किंवा लैंगिक छळ देखील केला जातो.

'द केरला स्टोरी' ही या राज्यातील तीन मुलींची कथा आहे. निर्मात्याने रिलीजपूर्वी दावा केला होता की, गेल्या काही वर्षांत केरळमधील 32,000 मुली ISIS च्या कटाला बळी पडल्या आहेत. परंतु या आकड्यांना बरच विरोध झाला. त्यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी असे केल्याचे स्पष्टीकरण दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT