Pankaj Bhadouria Saam tv
मनोरंजन बातम्या

Pankaj Bhadouria: प्रसिद्ध सेलिब्रिटी मास्टरशेफला ब्रेस्ट कॅन्सर; स्वत: पोस्ट करत दिली माहिती, मनोरंजनसृष्टीत खळबळ

Pankaj Bhadouria: 'मास्टरशेफ इंडिया'च्या पहिल्या पर्वाची विजेती पंकज भदौरियाने, आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे उघड केले आहे. तिने रुग्णालयातून स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे.

Shruti Vilas Kadam

Pankaj Bhadouria: 'मास्टरशेफ इंडिया'च्या पहिल्या सीझनची विजेती, पंकज भदौरियाने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर सांगितले आहे की त्यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. २८ मे रोजी, पंकजने हॉस्पिटलमधून एक फोटो शेअर केला, यामध्ये त्या हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेली दिसत आहे. त्यांच्या शरीराला मेडिकल वायर्स जोडलेल्या आहेत. त्यांनी त्या पोस्टला कॅप्शन दिले, "मला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. मला तुमच्या प्रार्थनाची गरज आहे."

त्यांनी हॉस्पिटलमधून एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. त्या व्हिडिओमध्ये, त्या हॉस्पिटलच्या गाऊनमध्ये बसलेली दिसत असून त्यांच्या हाताला मेडिकल कॅन्युला लावलेला आहे. व्हिडिओवरील कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "टेस्टसाठी जात आहे... अजिबात आनंदी नाही." त्यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर केला, यामध्ये त्यांनी त्यांच्या आजाराचे निदान आणि सध्याच्या आरोग्य स्थितीबद्दल माहिती दिली.

पंकज यांची पोस्ट

त्या म्हणाली, "मला तुम्हा सर्वांना कळवायचे आहे की मला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. तुम्ही सर्व माझ्यासाठी कुटुंबासारखे आहात, म्हणून मला ही गोष्ट तुम्हा सर्वांना वैयक्तिकरित्या सांगायची होती." या वेळी मला तुमच्या प्रार्थना आणि समर्थनाची खरोखर गरज आहे. म्हणतात ना, प्रार्थनेने चमत्कार घडतात. म्हणून मला तुमच्या प्रार्थनेची गरज आहे.

पंकज भदौरिया कोण आहेत?

२०१० मध्ये 'मास्टरशेफ इंडिया'चा पहिला सीझन जिंकल्यानंतर पंकज भदौरिया रातोरात प्रसिद्ध झाल्या. त्या देशाच्या पहिल्या मास्टरशेफ विजेत्या ठरल्या. या सीझनचे सूत्रसंचालन बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने केले होते. पंकज एक इंग्रजी शिक्षिका होत्या आणि या कुकिंग रिॲलिटी शोमध्ये भाग घेण्यासाठी त्यांनी आपली १६ वर्षांची नोकरी सोडली होती. त्या भारतातील सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ आणि टेलिव्हिजन होस्टपैकी एक बनल्या. त्यांनी 'शेफ पंकज का झायका', 'अफोर्डेबल किचन', '३ कोर्सेस विथ पंकज' आणि 'रसोई से - विथ पंकज भदौरिया' यांसारखे अनेक कुकिंग-आधारित शो होस्ट केले.

पंकज भदौरिया यांचे यूट्यूब चॅनल

पंकज यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडिया हँडलद्वारे मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्या त्यांच्या ऑनलाइन फॉलोअर्ससाठी सतत रेसिपी व्हिडिओ, स्वयंपाकाच्या टिप्स आणि इतर विविध गोष्टी पोस्ट करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT