Reshma Shinde SAAM TV
मनोरंजन बातम्या

Reshma Shinde: लगीन घटिका समीप आली…रेश्मा शिंदेला लागली मेहंदी, नवऱ्याचे नाव पाहिलत का?

Reshma Shinde Mehendi Ceremony : 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच तिचा मेहंदी सोहळा पार पडला आहे.

Shreya Maskar

सध्या मनोरंजन सृष्टीत लगीन घाई पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. तसेच काहींच्या लग्नाआधीच्या विधी सुरू झाल्या आहेत. घरोघरी मातीच्या चुली फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे.

रेश्माची 'लगोरी' मालिका खूप हिट झाली होती. या मालिकेतील तिच्या खास मैत्रिणींनी तिचे केळवण केले आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि अनुजा साठे यांनी छान रेस्टॉरंटमध्ये जाऊन रेश्माचे केळवण केलं.

आता नुकतेच रेश्माने सोशल मीडियावर आपल्या मेहंदीचे (Mehendi Ceremony) खास फोटो शेअर केले आहेत. तिचा मेहंदी सोहळा पार पडला आहे. रेश्माने मेहंदी सोहळ्याला पारंपरिक लूक केला आहे. तिने मेंहदी कलरचा ड्रेस परिधान केला आहे आणि केस मोकळे सोडले आहे. तसेच पारंपरिक ज्वेलरी घातली आहे. या लूकमध्ये रेश्मा खूपच सुंदर दिसत आहे. तिने या मेहंदी सोहळ्याच्या पोस्टला एक खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "माझी मेहंदी"

रेश्माच्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिच्या हातावर होणाऱ्या नवऱ्याच्या नावाची मेहंदी रंगली आहे. तिने मेहंदीत 'U' हे लेटर लिहिलं आहे. मात्र अद्यापही रेश्माचा नवरा कोण याचा खुलासा झाला नाही आहे. आता मात्र सर्वांना रेश्माचा होणारा नवरा कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT