Sindhutai Majhi Aai Gosht Chindhichi Promo Shared Instagram
मनोरंजन बातम्या

Sindhutai Majhi Aai Promo: मातृत्वाचा झरा बनून झाली लाखो अनाथ लेकरांची आई... ‘सिंधुताई माझी आई- गोष्ट चिंधीची’चा प्रोमो प्रदर्शित

Sindhutai Sakpal Serial: चित्रपटानंतर सिंधुताई यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना आता मालिकेच्या माध्यमातून पाहता येणार आहे.

Chetan Bodke

Sindhutai Majhi Aai Gosht Chindhichi Promo Shared: स्व. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांची सर्वत्र ‘अनाथांची माय’ अशी ओळख आहे. नेहमीच आपल्या पोटच्या लेकरांसारखं अनाथ मुलांसाठी ही त्या झटल्या. सिंधुताई यांची ख्याती एक थोर समाजसेविका म्हणून सर्वत्र आहे. चित्रपटानंतर सिंधुताई यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना आता मालिकेच्या माध्यमातून पाहता येणार आहे. २०२२मध्ये जानेवारी महिन्यात सिंधुताईंचे निधन झाले. त्यांना जीवनात करावा लागलेला अनेक अडथळींचा सामना, बालपणीचे काही किस्से असे अनेक मुद्दे आपल्याला या मालिकेतून पाहता येणार आहे.

सिंधुताईंच्या जीवनावर आधारित असलेल्या या मालिकेचे नाव ‘सिंधुताई माझी आई- गोष्ट चिंधीची’ असे असून ही मालिका लवकरच येत्या काही दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो कलर्स मराठीच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला असून या मालिकेची प्रेक्षकांना खुपच उत्सुकता लागली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी या मालिकेची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली होती. नुकताच आज या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम पेजवर या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. “मातृत्वाचा झरा बनून झाली ती लाखो अनाथ लेकरांची आई.. पाहा, नवी चरित्रकथा ‘सिंधुताई माझी आई- गोष्ट चिंधीची’, १५ ऑगस्टपासून फक्त कलर्स मराठीवर” अशा आशयाचं कॅप्शन देत प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

‘सिंधुताई माझी आई- गोष्ट चिंधीची’ या मालिकेमध्ये सिंधुताईंची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. यापूर्वी स्व. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटात सिंधुताईंची भूमिका अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने साकारली होती.

आता ‘सिंधुताई माझी आई- गोष्ट चिंधीची’ या मालिकेच्या माध्यमातून सिंधुताईंच्या बालपणातील काही किस्से, त्यांना जीवनात करावा लागलेला अनेक अडथळींचा सामना असे अनेक मुद्दे आपल्याला या मालिकेतून पाहता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT