Shreyas Talpade On Majhi Tujhi Reshimgath 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shreyas Talpade On Majhi Tujhi Reshimgath 2: ‘रेशीमगाठ पुन्हा एकदा जुळून आली...’ म्हणत श्रेयसने ‘माझी तुझी रेशीमगाठ २’च्या सीक्वेलबद्दल दिली हिंट

Majhi Tujhi Reshimgath 2 Latest Update: नुकताच श्रेयसने एक व्हिडिओ शेअर करत मालिकेचा दुसरा सीझन येणार असल्याची एक हिंट दिली आहे.

Chetan Bodke

Majhi Tujhi Reshimgath Serial Sequel Update: झी मराठीवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या मनावर आजही निर्विवाद वर्चस्व गाजवत आहे. त्यातीलच एक मालिका म्हणजे, ‘माझी तुझी रेशीमगाठ’. मालिकेत प्रमुख भूमिकेत श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे, मायरा वायकूळ आणि संकर्षण कऱ्हाडे हे सेलिब्रिटी प्रमुख भूमिकेत होते.

श्रेयस आणि प्रार्थनाची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. सोबतच परीच्याही अभिनयाने देखील या मालिकेला चांगलंच प्रसिद्धी दिली. फार कमी कालावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्याने प्रेक्षक फारच नाराज झाले होते. नुकताच श्रेयसने एक व्हिडिओ सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओवरून मालिकेचा दुसरा सीझन येणार असल्याची एक हिंट दिली आहे.

श्रेयसने शेअर केलेल्या एका व्हिडिओत , तो एका शूटिंग स्पॉटवर असल्याचं दिसत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत श्रेयस म्हणतो, “ ‘अगर आप किसी चीज को पुरे दिल से चाहो तो पुरी कायनात उसे आपसे मिलाने की साजिश मे लग जाती है’ आणि आम्हाला दोघांनाही मनापासून असं वाटत होतं की, आपण भेटावं पण, वेळ येत नव्हती आणि घटना देखील तशी येत नव्हती, सोबतच भेटण्यासाठी कारण ही कळत नव्हते. पण दोघांच्याही मनात ते सतत होतं.”

श्रेयस त्याच्या व्हिडिओत पुढे म्हणतो, “विशेषत: ‘माझी तुझी रेशीमगाठ’ जे चाहते आहेत त्यांना आज हे बघून आनंद होईल की, कोणताही विचार न करता, आज काहीही न ठरवता ती भेट होत नव्हती. अखेर आज आमच्या दोघांचे शूटिंग एकाच लोकेशनला ठरलं. आम्ही एकमेकांसमोर आलो आणि त्यात तो पाऊस धो- धो पडत होता. आमची भेट झालीच आणि ही रेशीमगाठ पुन्हा एकदा जुळून आली. आज मी तुम्हाला भेटवतोय माझ्या डार्लिंगशी...” आणि श्रेयसची ती डार्लिंग दुसरी तिसरी कोणी नसून मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर आहेत.

श्रेयसने व्हिडिओमध्ये अयज मयेकरांना विनंती करतो, जोपर्यंत तू ‘माझी तुझी रेशीमगाठ २’बद्दल सांगत नाही, तो पर्यंत मी तुला जाऊन देणार नाही. त्यावर अजयने श्रेयसला म्हणतो की, ‘सर मला जाऊ द्या माझं शूट आहे. मालिकेसाठी तुमच्या आणि मॅडमच्याही तारखा नाहीत.’ असं म्हणत असताना देखील श्रेयस तळपदे दिग्दर्शक अजय मयेकरांना सोडत नाही.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला असून अनेक चाहत्यांनी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ चा दुसरा सीझन कधी येणार असा प्रश्न विचारला.

या व्हिडिओवर प्रार्थना बेहरेनेही कमेंट केली, ‘अजय मयेकर सर्रररर... माझ्या तारखा तुमच्यासाठी नेहमीच फ्री आहेत. मी ही तुमच्या दोघांची मस्ती मिस केली.’अशा आशयाची प्रतिक्रिया तिने दिली. सोबतच मालिकेत प्रार्थनाच्या वहिनीने भूमिका साकारलेल्या प्राची पाटीलनेही प्रतिक्रिया दिली. ती म्हणते, ‘हाहाहा... माझ्याही आहेत.. मी ही फ्री आहे. मला शूटिंगच्या दिवसांची खूपच आठवण येतेय.’

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Maharashtra Live News Update : सांगली-मिरजला पावसाने झोडपले,

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

SCROLL FOR NEXT