Ketaki Chitale Deep Amavasya Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ketaki Chitale And Deep Amavasya: ‘३ दात काढलेय, बोलता येत नाहीये’; दीप अमावस्येच्या दिवशी केतकीने सांगितली ‘दंत कथा’

Chetan Bodke

Ketaki Chitale Deep Amavasya Post: केतकी चितळे जेवढी अभिनयामुळे चर्चेत नसेल आली, त्याहून अधिक ती तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आली. एकदा तिला काही वादग्रस्त विधानांमुळे पोलिस कोठडी देखील मिळाली होती. केतकी चितळे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांसोबत केतकी अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर पोस्ट शेअर करत असते. नुकतेच केतकीने सोशल मीडियावर दिप अमावस्या संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली.

दिप अमावस्याबद्दल शेअर केलेल्या पोस्टमध्ये केतकीने स्वत:ची दंतकथा देखील सांगितली. त्या पोस्टमध्ये केतकीने काही फोटोदेखील शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तिच्या घरात दीप पूजन केलेले दिसत आहे. तर तिच्या पुढच्या फोटोंमध्ये अभिनेत्री दिवे खाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सध्या तिच्या पोस्टवर चाहत्यांनी तिला काळजी घ्यायला सांगितले.

शेअर केलेल्या पोस्टवर केतकी म्हणते, “माझी दंत कथा, भाग ४: ३ दात काढले आहेत. बोलता येत नाहीये, नीट काही खाता येत नाहीये, मळमळ, वर्टीगो, सर्व चालू आहे त्या एंटिबायोटिक्स मुळे. इलाज नाही कारण एपिलेप्सी औषधे व ही औषधे एकमेकांबरोबर क्लॅश होतात! पण, आज दीप पूजन म्हंटल्यावर दिवे तर झालेच पाहिजेत. आगाऊपणा बघा, तोंड उघडता येत नसले तरी दिवे खायचे नाही, असे कसे!! तुम्हा व तुमच्या परिवारास दिव्याच्या अवसेच्या शुभेच्छा.”

काही दिवसांपुर्वी केतकीने तिच्या आयुष्यावर आधारित असलेल्या पुस्तकाचं प्रकाशन करणार असं सांगितलेय. केतकीचे हे पुस्तक पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार असून तुरुंगात जाण्यामागील कारणं समोर येणार आहेत. सोबतच तिने तुरूंगात वेळ कसा घालवला. यावर ती पुस्तक लिहिणार आहे. मे २०२२ मध्ये केतकी ४१ दिवसांकरिता तुरूंगात गेली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे केतकीला तुरुंगावास भोगावा लागला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT