Bigg Boss Marathi 5 Date Declared Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी’चा ५वा सीजन लवकरच, यंदा कोणते सेलिब्रिटी दिसणार?

Chetan Bodke

Bigg Boss Marathi 5 Date Declared: टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक असणारा कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस मराठी’. २०२३ च्या सुरूवातीलाच ‘बिग बॉस मराठी ४’ ने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

सर्वाधिक टीआरपी आणि नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या या शोला प्रेक्षक आवर्जुन चांगलाच प्रतिसाद देतात. गेल्या सीझनचा विजेता अक्षय केळकर झाला होता. ‘बिग बॉस मराठी ४’शो ने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर आता या शोचा पुढील भाग कधी येणार? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. अखेर प्रेक्षकांना ‘बिग बॉस मराठी’चा पुढील सीझन कधी येणार याची माहिती मिळाली आहे.

कलर्स मराठीवर प्रक्षेपित झालेल्या सर्वच सीझनची सोशल मीडियावर चर्चा झाल्यानंतर आता ‘बिग बॉस मराठी’चा पुढील सीझनची चर्चा होतेय. मिळालेल्या माहितीनुसार, पाचव्या सीझनच्या सेटचं काम सुरू आहे. ‘बिग बॉस मराठी ४’चा अंतिम सोहळा पार पडल्यानंतर त्याच सेटवर ‘बिग बॉस मल्याळम’ हा कार्यक्रम सुरू होता.

नुकताच या शोचा ग्रँड फिनाले ७ जुलैला पार पडला. त्यानंतर आता ‘बिग बॉस मराठी ५’च्या सेटचे काम सुरू आहे. सेटचे सर्व काम सप्टेंबरपर्यंत पुर्ण होणार असून हा शो सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ‘बिग बॉस मराठी ५’ सुरू होऊ शकतो.

गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील बिग बॉस मराठी आणि हिंदी हे दोन्ही कार्यक्रम एकत्र सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे दोन्हीही शो क्लॅश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठी बिग बॉसच्या सुत्रसंचालनाची धुरा महेश मांजरेकरांकडेच असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT