TRP Ratings Of Marathi Serial : ‘झी मराठी’च्या नव्या मालिकांचा टीआरपी वाढला; ‘पारू’, ‘शिवा’, ‘नवरी मिळे हिटरलरला’ची क्रेझ वाढली
TRP Ratings Of Marathi Serial Saam Tv
मनोरंजन बातम्या

TRP Ratings Of Marathi Serial : ‘झी मराठी’च्या नव्या मालिकांचा टीआरपी वाढला; ‘पारू’, ‘शिवा’, ‘नवरी मिळे हिटरलरला’ची क्रेझ वाढली

Chetan Bodke

टेलिव्हिजन सीरियल्स कायमच घराघरांत पाहिल्या जातात. सिरीयल्स पाहण्याचा कल प्रेक्षकांचा सर्वाधिक आहे. एकदा का संध्याकाळ झाली की प्रेक्षक मालिका आवर्जुन पाहतात. सध्या प्रेक्षकांचे मनोरंजनाचे साधन ही बदलले आहे. जरीही ओटीटीचा कल वाढला असला तरीही मालिका प्रेक्षक आवर्जुन पाहतात. नुकताच टीआरपी चार्ट जाहीर झाला आहे. या यादीत झी मराठी आणि स्टार प्रवाहवरील मालिकेत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

टीआरपीसाठी नेहमीच चढाओढ सुरू असते. गेल्या अनेक महिन्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत जुई गडकरीच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेला दमदार प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच 'मराठी मनोरंजन ऑफिशियल' या इन्स्टाग्राम हँडलवरून मराठी सिरीयलचा टीआरपी रेट शेअर केलेला आहे. हा टीआरपी चार्ट ११ मे ते १७ मे दरम्यानचा आहे. या चार्टमध्ये, स्टार प्रवाह, झी मराठी आणि कलर्स मराठीवरील सीरियलचा समावेश आहे.

पहिल्या क्रमांकावर टीआरपीच्या शर्यतीत जुई गडकरीची ‘ठरलं तर मग’ मालिका आहे. या मालिकेची कायमच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते. सध्या प्रेक्षकांकडून प्रेक्षकांना मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेला टीआरपीमध्ये ६.७ इतके स्टार्स मिळालेले आहेत. तर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेला ६.४ इतके स्टार मिळालेले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून ‘ठरलं तर मग’ आणि ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या दोन मालिकांमध्ये टीआरपीच्या बाबतीत चुरशीची लढत होत आहे.

तर तिसऱ्या क्रमांकावर मल्हारची 'तुझेच मी गीत गात आहे' या सीरियलने टीआरपी चार्टमध्ये बाजी मारली आहे. तर चौथ्या क्रमांकावर तेजश्री प्रधान, राज हंचनाळे आणि अपूर्वा नेमळेकर यांची 'प्रेमाची गोष्ट' मालिकेने बाजी मारली आहे. टीआरपीच्या शर्यतीत झी मराठी आणि स्टार प्रवाहवरील मालिकेत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. झी मराठीवरील 'पारू' ही मालिका टीआरपी चार्टमध्ये १७ व्या क्रमांकावर आहे. तर 'तुला शिकविनच चांगला धडा' ही मालिका १८ व्या क्रमांकावर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar On Team India: जिंकल्यावर उदो उदो होतो, हरलो तर लोक दगडंही मारतात; टीम इंडियासमोर अजित पवारांची फटकेबाजी

bJP Prabhari List : महाष्ट्रातील ३ नेत्यांकडे भाजपच्या प्रभारीपदाची जबाबदारी; कोणत्या नेत्यांना दिली संधी?

Priya Varrier : प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी गं...!

Rohit Sharma Speech:...नाहीतर मी त्याला बसवला असता, सूर्याच्या कॅचवरुन रोहितचं 3 मिनिटांचं भाषण गाजलं; पाहा VIDEO

Video : सुर्यकुमार यादवने सांगितला 'त्या' कॅचचा किस्सा, कशी केली कॅचसाठी तयारी? PM मोदींकडून कौतुक

SCROLL FOR NEXT