Swanandi Tikekar And Singer Ashish Kulkarni Will Get Married Soon Instagram
मनोरंजन बातम्या

Swanandi Tikekar Boyfriend: प्रेम म्हणजे प्रेम असतं! स्वानंदी टीकेकरने सोशल मीडियावर सांगितली मनातली गोष्ट

Swanandi Tikekar News: चित्रपटातून आणि मालिकेतून प्रकाशझोतात आलेली स्वानंदी टिकेकर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

Chetan Bodke

Swanandi Tikekar And Singer Ashish Kulkarni Will Get Married Soon: टेलिव्हिजन अभिनेत्री स्वानंदी टिकेकर नेहमीच आपल्या अभिनयासह फॅशनसाठी सोशल मीडियावर चर्चेत असते. स्वानंदी सिनेअभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची लेक आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून प्रकाशझोतात आलेली स्वानंदी सध्या यावेळी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. यावेळी अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नुकताच सोशल मीडियावर तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे.

नेहमीच चित्रपटातून आणि मालिकेतून प्रकाशझोतात आलेली स्वानंदी टिकेकर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. बुधवारी सकाळी स्वानंदीने सोशल मिडीयावर तिच्या बॉयफ्रेंडचा खुलासा केलाय. स्वानंदीने अचानक ही गुड न्युज दिल्याने तिच्या फॅन्सचा देखील आनंद गगनात मावेनासा झालाय. त्या पोस्टवर स्वानंदीला बॉयफ्रेंड संबंधित अनेक प्रश्न विचारले आहेत.

स्वानंदीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये, तिने तिच्या बॉयफ्रेंडचे देखील नाव सांगितले. गायक आशिष कुलकर्णी सोबत फोटो शेअर करत अभिनेत्रीने लग्न करणार असल्याची माहिती दिली आहे. पोस्टबरोबर स्वानंदीने आमचं ठरलं आणि लव्ह असे दोन हॅशटॅगही दिले आहेत. अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करतात चाहत्यांनी फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.

स्वानंदीच्या बॉयफ्रेंडबद्दल बोलायचे तर, आशिष कुलकर्षी गायक- संगीतकार आहे. तो Indian Idol 12 व्या सीझनमध्ये सहभागी होता. आशिष कुलकर्णी स्वत:चे लाईव्ह शोज सुद्धा करतो. आशिष आणि स्वानंदी हे दोघेही रिलेशनमध्ये असल्याने त्यांच्या फॅन्सली आनंद गगनात मावेनासा झालाय. ते दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र दोघांनी आज त्यांच्या रिलेशनबद्दल अखेर आज भाष्य केले आहे.

स्वानंदीच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांसोबत अनेक मराठी सेलिब्रिटींनी देखील दोघांना शुभेच्छा दिल्या. नम्रता संभेराव, ईशा केसकर, नचिकेत लेले, राहुल देशपांडे, रसिका सुनील, गौतमी देशपांडे अशा अनेक कलाकारांनी स्वानंदीला सोशल मिडीयावर शुभेच्छा दिल्यात.

स्वानंदीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर.. स्वानंदी अलीकडेच अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई? या मराठी टेलिव्हिजन सिरीयलमध्ये झळकली होती. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT