Marathi Actress Wedding saam tv
मनोरंजन बातम्या

Marathi Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, विवाह सोहळ्यातील खास VIDEO आला समोर

Anushka Sarkate - Nikhil Chavan Wedding : 'कारभारी लयभारी' फेम अभिनेत्री नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्न सोहळ्याचे खास फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

Shreya Maskar

'कारभारी लयभारी' फेम कपल नुकतेच लग्न बंधनात अडकले.

अभिनेत्रीच्या लग्नाचा खास व्हिडीओ समोर आला आहे.

लग्नसोहळ्यातील अभिनेत्रीच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मराठी इंडस्ट्रीतील लाडके कपल नुकतेच लग्न बंधनात अडकले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का सरकटेच्या घरी गेले काही दिवस लगीन घाई पाहायला मिळाली. अखेर अनुष्का सरकटेने अभिनेता निखिल चव्हाणसोबत लग्नगाठ बांधली. अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण हे 'कारभारी लयभारी' या मालिकेतून एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला आले. अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण यांचा शाही विवाह सोहळा २४ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे थाटामाटात पार पडला.

अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण यांच्या मेहंदी , हळद, साखरपुडा आणि संगीत या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. आता त्याच्या लग्न सोहळ्याचा खास व्हिडीओ समोर आला आहे. अभिनेता आणि निर्माता तेजपाल वाघने सोशल मीडियावर अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण यांच्या लग्नाचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

कलाकारांची मांदियाळी

अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाणच्या लग्न सोहळ्याला कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. 'कारभारी लयभारी, 'लागिरं झालं जी' मालिकेचे कलाकार आले होते. तसेच भरत जाधव, प्रथमेश परब, सिद्धार्थ जाधव हे मराठी मनोरंजन विश्वातील मोठे कलाकारही आले होते. कलाकारांनी संगीत सोहळ्यात भन्नाट डान्स करून चारचाँद लावले. चाहते कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांनी नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.

अनुष्का सरकटे लूक

अभिनेत्री अनुष्का सरकटेने लग्न सोहळ्यासाठी खास गुलाबी रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली होती. हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा, नाकात नथ, डोक्याला मुंडावळ्या बांधून तिने लूक पूर्ण केला होता. अनुष्का आणि निखिल दोघेही लग्नात सुंदर आणि आनंदी दिसत होते. अनुष्का आणि निखिलने लग्नमंडपात डोक्यावर तुळस, हाती झेंडा घेऊन पारंपरिक स्वरुपात एन्ट्री घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT