Sankarshan Karhade Visit Ambabai Temple Instagram
मनोरंजन बातम्या

Sankarshan Karhade News: ‘पहाटे अडीच वाजता मंदिरात गेलो अन्...’ कोल्हापुरच्या अंबाबाईच्या दर्शनाला गेलेल्या संकर्षण कऱ्हाडेने मंदिरातला सांगितला अनुभव

Sankarshan Karhade Post: संकर्षणने कोल्हापुरातील अंबाबाईच्या दर्शनाचा अनुभव चाहत्यांबरोबर पोस्टच्या माध्यमातून शेअर केला आहे.

Chetan Bodke

Sankarshan Karhade Visit Ambabai Temple

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नेहमीच आपल्या अभिनयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. ‘तू म्हणशील तसं’ नाटक आणि ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या सांगितिक कार्यक्रमातून तो सध्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातून संकर्षण कऱ्हाडेने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. नुकतंच संकर्षणने कोल्हापुरातील अंबाबाईच्या दर्शनाचा अनुभव चाहत्यांबरोबर पोस्टच्या माध्यमातून शेअर केला आहे.

संकर्षण कऱ्हाडे आपल्या पोस्टमध्ये बोलतो, “सुप्रभात आज पहाटे २.३० पासुनचा अनुभव कार्तिक मासामध्ये महालक्ष्मी देवीच्या; अंबाबाईच्या नित्योपचारात बदल होतो. पहाटे २.३० वा. मंदिर उघडते आणि काकडा सुरू होतो. मशाल घेवून देवीच्या कळसापासून कापूर लावण्यास सुरवात होते ते गाभाऱ्यातल्या जवळपास १५० मंदिरांच्या ठिकाणी कापूर प्रज्वलीत केला जातो. पहाटे ३ / ३.३० वा. सगळा परिसर कापूराच्या ज्योतीने ऊजळेला पाहून काय प्रसन्न वाटत होतं. त्यात हे सगळं सनईच्या गोड आवाजात….” (Social Media)

“हे करता करता देवीसमोरचं दार म्हणजे मुख्य गर्भगृह उघडलं जातं आणि देवीला “ऊठ ऊठ माते अरुणोदय झाला” अशी साद घालत जागं केलं जातं देवीची काकडा आरती केली जाते. काल सांगलीचा रात्रीचा प्रयोग करून मी पहाटे २.३० वा. मंदिरात आलो हा सगळा सोहळा मला पहिल्यांदाच पहाता आला… अनुभवता आला…. आणि तुम्हाला सांगतो; देवीच्या पायवर डोकं ठेउन दर्शन घेता आलं” काय सांगावं कसं वाटलं.. माझे डोळे सतत भरून येत होते.. मनांत काय भाव आले हे सांगताच येणार नाही असा हा अनुभव होता. कालचा सांगलीचा प्रयोग जोरदार झाला.” असं संकर्षण आपल्या पोस्टमध्ये म्हणाला. संकर्षण सध्या ‘तू म्हणशील तसं’ या नाटकामुळे व्यस्त आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bogus Voter List : 'प्रत्येक ठिकाणी 4 लाख बोगस मतदार'; व्होटचोरीचं लोण मुंबईपर्यंत, वाचा स्पेशल रिपोर्ट

Pothole Deaths : 'खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास वारसांना भरपाई'; मुंबई हायकोर्टाने काय निर्णय दिला? जाणून घ्या

Makyacha Chivda Recipe: दिवाळीसाठी कुरकुरीत खमंग मक्याचा चिवडा कसा बनवायचा?

Mumbai-Ahmedabad Highway: अवजड वाहनांच्या 15 किलोमीटरपर्यंत रांगा; चौथ्या दिवशीही मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी

Dangers of eating quickly: घाईघाईत जेवणाची सवय तुम्हालाही आहे का? शरीरात सुरू होतो ‘हे’ धोकादायक बदल

SCROLL FOR NEXT