Nandesh Umap And Sarita Umap Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nandesh Umap: लग्नाच्या 25 व्या वाढदिवशी पुन्हा विवाहबंधनात अडकले नंदेश उमप, पत्नीसोबतचे फोटो शेअर करत म्हणाले...

Nandesh Umap And Sarita Umap Wedding: नंदेश उमप लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा विवाहबंधनात अडकले आहेत. पत्नी सरितासोबत त्यांनी पुन्हा लग्न केले. त्यांच्या लग्नाचे (Nandesh Umap Wedding) फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Priya More

Nandesh Umap And Sarita Umap Wedding Photos:

शाहीर नंदेश उमप (Nandesh Umap) आपल्या मधूर आवाजाने सध्या मराठी मनोरंजनसृष्टीवर राज्य करत आहेत. आपल्या भारदस्त आवाजात गाणी, पोवाडा, अभंग गाऊन ते मराठी रसिकांचे मनोरंजन करत आहेत. अशामध्ये नंदेश उमप हे सध्या चर्चेत आले आहेत. नंदेश उमप लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा विवाहबंधनात अडकले आहेत. पत्नी सरितासोबत त्यांनी पुन्हा लग्न केले. त्यांच्या लग्नाचे (Nandesh Umap Wedding) फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

नंदेश उपम आणि सरिता उमप यांची मुलगी आयुषीने त्यांच्या लग्नाचा हा सोहळा आयोजित केला होता. नंदेश उमपच्या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी हजेरी लावली होती. या लग्नाला अभिनेत्री सुकन्या मोने यांनी हजेरी लावली होती. त्याचसोबत मराठमोळी अभिनेत्री आणि निवेदिका समीरा गुजरने नंदेश उमप आणि सरिता उमप यांच्या लग्नाला हजेरी लावली. समीरानेच सोशल मीडियावर नंदेश उमप यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत खास पोस्ट केली आहे. सध्या नंदेश उमप यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.

समीराने या पोस्टमध्ये नंदेश उमप यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत असे लिहिले की, 'माझ्या लाडक्या नंदेशदादा आणि सरिता वहिनीच्या लग्नाचा 25 वा वाढदिवस... बावनकशी सोन्यासारख्या मौल्यवान जोडीचा संसाराचा रौप्य महोत्सव... त्यांच्या लेकीने, आयुषीने फार सुरेख समारंभ आयोजित केला होता... हे माझेच कुटुंब आहे आणि माझे हे कुटुंब असेच आनंदात राहो आणि लोकांना आनंदी करत राहो... खूप खूप प्रेम नंदेश उमप, सरिता उमप आणि आयुषी उमप... आणि मी मराठी परिवाराची तमाम जनता...'

लग्नामध्ये नंदेश उमप आणि सरिता उमप हे खूपच सुंदर दिसत होते. नंदेश आणि सरीता यांनी एकाच रंगाची ड्रेसिंग केली होती. सरिता यांनी लेहेंगा परिधान केले होता. तर नंदेश उमप यांनी शेरवानी परिधान करत डोक्यावर फेटा घालता होता. दोघांचे एकमेकांना अंगठी घालतानाचे आणि नंतर वरमाला घालतानाचे फोटो आहेत. दोघेही लग्नामध्ये खूपच सुंदर आणि आनंदी दिसत होते. सध्या दोघांवर देखील शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT