Jai Jai Swami Samarth SAAM TV
मनोरंजन बातम्या

Jai Jai Swami Samarth : 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत नवा ट्विस्ट, सुरू होणार दोन सख्ख्या भावांची गोष्ट

Marathi Serial Update : 'जय जय स्वामी समर्थ' मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत दोन सख्ख्या भावांची गोष्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेचे पुढील अपडेट जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'जय जय स्वामी समर्थ' (Jai Jai Swami Samarth) मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. सध्या 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत दोन सख्ख्या भावांची गोष्ट पाहायला मिळणार आहे. थोरला भाऊ वासुदेव आणि लहान यशोधन अशी त्यांची नावे आहेत. यांच्या आयुष्यातील संघर्ष, नात्यांतील तणाव आणि अहंकाराच्या लढाईत स्वामींच्या लीलांची अद्भुत गुंफण पाहायला मिळते.

वासुदेव कर्तृत्ववान आणि स्वाभिमानी तर यशोधन आईच्या प्रेमात गुरफटलेला आणि तब्येतीमुळे दुबळा पाहायला मिळणार आहे. या दोन भावांमधील विरोधाभास आणि त्यांच्या कुटुंबातील नाजूक नाती हा कथेचा गाभा असला तरी स्वामी आपल्या लीलांनी या कुटुंबावर कसा प्रभाव टाकतात? कसे बदल आणि समर्पण यांचे सत्य कसे उलगडतात आणि अहंकाराच्या अंधारातून सत्याच्या प्रकाशाकडे कसा प्रवास घडवतात? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

वासुदेवचा 'मीच सर्वकाही' हा सूक्ष्म अहंकार आणि स्वामींचे 'बदल हेच चिरंतन' हे तत्वज्ञान यांच्यातील संघर्ष ही या कथेची खासियत आहे. 'जय जय स्वामी समर्थ' मालिका कलर्स मराठीवर रात्री 8.00 वाजता पाहायला मिळते. स्वामींच्या लीलांमधून मिळणारे जीवनाचे धडे, भावनांचे कंगोरे आणि अंधश्रद्धा, श्रद्धा यातील सीमारेषा दाखवणारी ही कथा प्रेक्षकांना नक्कीच भावुक करेल.

वासुदेव आणि यशोधन यांच्या नात्यातील चढ-उतार आणि स्वामींच्या कृपेमुळे त्यांच्या आयुष्यात घडणारे बदल यांचा प्रवास अनुभवायला मिळणार आहे. 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेचा मोठा चाहता वर्ग आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT