Indrayani  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Indrayani : काका काकूंच्या येण्याने इंदूला मिळणार आधार, 'इंद्रायणी' मालिकेत नवा ट्विस्ट

Indrayani Serial Update : 'इंद्रायणी' मालिकेत आता नवे वळण पाहायला मिळणार आहे. इंदूला आधार देण्यासाठी काका काकू येणार आहेत.

Shreya Maskar

इंद्रायणी (Indrayani ) मालिकेत सध्या बाल कीर्तनकार इंदूचे कीर्तन गावागावांत गाजते आहे. इंदूला बऱ्यापैकी नावलौकिक देखील मिळत आहे. आनंदीबाई इंदूला त्यांना हवे तसे वागविण्यात यशस्वी होत आहेत. पण व्यंकू महाराजांची साथ असल्याने आनंदीबाईंच्या मार्गात अजूनही अडथळा आहेच असं म्हणायला हरकत नाही. आनंदीबाईंचा लोभ दिवसेंदिवस वाढतेच आहे.

व्यंकू महाराजांनी कानउघडणी करून देखील आंनदीबाईंच्या वर्तनात काहीच बदल दिसून येत नाहीये. पण अश्यातच आता मालिकेत इंदूच्या काका काकूंची एन्ट्री झाली आहे. त्यांच्या येण्याने आनंदीबाई नाखुश आहेत. दुसऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याची क्षमता विठुरायाने इंदुकडे दिली, मग तिच्या दुःखात, तिच्या सुखात सहभागी होणारी हक्काची माणस खरंच तिला मिळणार का? कारण, आजवर इंदूचे स्वतःचे असे म्हणण्यासारखे रक्ताच्या नात्यातील कोणीच नव्हते जे तिच्या बाजूने लढतील, तिला तिचा हक्क मिळवून देतील.

आता काका काकूंच्या येण्याने आनंदीबाईंच्या स्वार्थात आणि पैसे कमावण्याच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अचानक हे काका काकू कुठून आले? त्यांच्या येण्याने इंद्रायणीच्या आयुष्यात काय परिणाम होईल ? काका काकूंच्या रूपात इंदूला मिळणार का नवा आधार? मालिकेत हे सर्व पाहणे आता मनोरंजक ठरणार आहे. 'इंद्रायणी' मालिका ७.०० वाजता कलर्स मराठीवर लागते.

काका काकूंच्या येण्याने इंदूचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. इंदू त्यांची ओळख तिच्या फँटया गॅंगशी करून देते. त्यांना घर दाखवते. पण, एकीकडे विठूच्या वाडीतील लोकांना त्यांच्यावर संशय येतो आहे. तर, दुसरीकडे काका काकूंना अपत्य नसल्याने त्यांनी इंदूला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. व्यंकू महाराज आणि इंदूचं नातं रक्ताचं नसलं तरीदेखील ते बाप - लेकीसारखाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT