Indrayani Marathi Serial Saam Tv
मनोरंजन बातम्या

Indrayani Marathi Serial: थंडा थंडा कूल कूल! नाशिकच्या 11 डिग्री तापमानात इंद्रायणी मालिकेचं शूटिंग

Indrayani Serial Update: नाशिकमध्ये कडाक्याच्या थंडीत इंद्रायणी मालिकेचं शूटींग सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या इंद्रायणी मालिकेच्या महाएपिसोडनेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Manasvi Choudhary

सध्या वातावरण थोडं थंडावल्यामुळे सर्वजण सुखावले आहेत. या गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यात सर्वजण दंग आहेत. 'कलर्स मराठी'वरील 'इंद्रायणी' या लोकप्रिय मालिकेच्या सेटवरदेखील असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय. नाशिकमध्ये कडाक्याच्या थंडीत मालिकेचं चित्रीकरण सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या महाएपिसोडनेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. विशेष म्हणजे या महाएपिसोडचंही रात्रीच्या गारेगार थंडीत चित्रीकरण पार पडलं होतं. थंडगार वातावरणात गरम चहा आणि शेकोटी करत शूटिंग करण्यात आलं आहे.

नाशिकमधील थंडीत शूटिंग करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना अनिता दाते म्हणतात,"इंद्रायणी' मालिकेचा नुकताच महाएपिसोड पार पडला आहे. त्या महाएपिसोडचं आम्ही गेलं आठवडाभर शूट करत होतो. आम्ही नाशिकमध्ये मालिकेचं शूटिंग करत असून सगळीकडे प्रचंड धुकं पडलेलं आहे. जवळजवळ 11 डिग्री तापमान आहे. पहाटे पहाटे ते आणखी कमी होत जातं.

मोठ्यांसह सेटवरील लहान मुलंदेखील थंडी एन्जॉय करत काम करत आहेत. स्वेटर, शाली या गोष्टींच्या सहाय्याने आम्ही मोठ्या-मोठ्या सीनचं शूटिंग करत आहोत. बऱ्याचदा आमच्या कॉस्च्युममुळे स्वेटरही घालता येत नाही. तरीसुद्धा सगळे नाशकातील थंडी एन्जॉय करत खूप उत्साहाने काम करत आहेत. त्यामुळे खूप मजा येते".

'इंद्रायणी' मालिकेत इंदूची भूमिका साकारणारी सांची भोईर म्हणाली,"महाएपिसोडचं आम्ही शूट केलं त्यादिवशी खूप थंडी होती. सेटवरची सर्वच मंडळी कुडकुडत होते. माझा कीर्तनाचा वेगळा ड्रेस असल्याने स्टेवर घालता आलं नाही. पण सीन कट होताच पळत जाऊन मी स्वेटर घातलं. या सगळ्यात एक वेगळीच गंमत होती. शूटिंगदरम्यान आम्ही सेटवर शेकोटीदेखील केली. थंडीमुळे दातखीळ, तोंडातून वाफ निघणे हे प्रकार घडत होते. एकंदरीतच खूप मजा करत आम्ही शूटिंग पूर्ण केलं आहे".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: गुजरातच्या फलंदाजीला सुरुवात, सालामीवीर साई सुदर्शन आणि शुभमन गिल क्रीजवर

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर पावसाला सुरुवात

लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांना पुन्हा १५०० रुपये मिळणार? सुप्रिया सुळेंची फडणवीस सराकारकडे मोठी मागणी

Fort In Nashik : आकाशाला भिडणाऱ्या पायऱ्यांचा थरार, नाशिकमधील 'या' किल्ल्याची भव्यता पाहून हृदयाचा ठोका चुकेल

Monday Horoscope: कामाच्या ठिकाणी कौतुक होणार, ५ राशींचे बढतीचे योग आहेत; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT