Avadhoot Gupte And Friends Video Viral Instagram
मनोरंजन बातम्या

Avadhoot Gupte Video: अखेर अवधूत गुप्तेचं छोटसं स्वप्न पूर्ण, मित्रांसोबत धम्माल करतानाच्या Video सोबत शेअर केला अनुभव

Avadhoot Gupte And Her Friends Video: अवधूतने सोशल मीडियावर आपल्या मित्रांसोबत एक छोटं स्वप्न पुर्ण केल्याची माहिती पोस्ट शेअर केली आहे.

Chetan Bodke

Avadhoot Gupte And Friends Video Viral

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते ‘खुपते तिथे गुप्ते’ या टेलिव्हिजन शोमुळे प्रचंड चर्चेत होता. या शोने गेल्या सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांची रजा घेतली. अवधूत गुप्ते कायमच सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो. नुकतंच अवधूतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्याने आपल्या मित्रांसोबत एक छोटं स्वप्न पुर्ण केल्याची माहिती दिली आहे. स्वप्न पुर्ण करताना त्यांच्यासोबत गायक स्वप्निल बांदोडकर आणि अजित परब या दोघांचीही साथ लाभली आहे, यावेळी तिघांनीही केलेली धम्माल मस्ती प्रचंड चर्चेत आली आहे.

अवधूतने शेअर केलेल्या पोस्टमध्ये चाहत्यांना फार्महाऊसची झलक दाखवलीय. या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत गायक स्वप्निल बांदोडकर आणि अजित परब हे दोघेही दिसत आहेत. त्यांच्यासोबत काही गावकरी सुद्धा दिसून येत आहेत. गावकऱ्यांनी त्यांना बोटीत हवा भरायला मदत केली. यावेळी तिघांनीही बोटिंग आणि नदीत पोहोण्याचा आनंद घेतला. सध्या त्या तिघांचीही धम्माल मस्ती करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अवधूत शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगतो, “दरवर्षी धरण भरलं की पाणी गळाभेट घ्यायला आल्यासारखं डोंगराच्या पायथ्याशी यायचं आणि मी सुद्धा पाय बुचकळून तासनतास बसायचो! दरवर्षी मनात यायचं की ह्यापेक्षा जास्त जवळ जायला हवं त्याच्या.. पण त्यासाठी स्वतःची बोट हसायला हवी. मनात आलं, की टाकली पाण्यात आणि सुरुवात केली वल्हवायला! मोठ्या स्वप्नांच्या मागे धावत असताना छोटी स्वप्न पूर्ण करायचं राहूनच जातं.. झालं!! त्यातलं हे एक पूर्ण केलं!!! ते सुद्धा स्वप्निल बांदोडकर आणि अजित परब सारख्या मित्रांच्या साथीनं...”

एकंदरीतच व्हिडीओबद्दल सांगायचे तर, व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला अवधूतने त्याची स्वत:ची एक सुंदर कविता दिली आहे. त्या कवितेचे नाव ‘ना कोणते दु:ख ना कोणता आनंद’ ही कविता त्याने दिली आहे. व्हिडीओमध्ये त्या तिघांनीही बोटीत हवा भरण्यापासून ते पाण्यात धम्माल मस्ती केल्याची दिसून येत आहे. एकंदरीतच या तिघांनीही आपल्या बिझी शेड्युल्डमधून थोड्या विसाव्याच्या क्षणाचा आनंद लुटलेला दिसत आहे. अभिनेत्याने छोट्या छोट्या स्वप्नांमधूनही आनंद लुटल्यामुळे त्याचे कौतुक होत आहे. अवधूतच्या ह्या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT