Sari Poster
Sari Poster Saam TV
मनोरंजन बातम्या

Marathi Movie Sari: अजिंक्य राऊत- रितिका श्रोत्री यांची अनोखी कहाणी; 'सरी'मध्ये दिसणार प्रेमाचा त्रिकोण

Pooja Dange

Marathi Movie Sari Poster Out: मराठी अनेक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेमावर आधारित असलेला 'सरी' हा चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटामधील प्रमुख भूमिकेत असलेल्या कलाकारांचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे.

'सरी' चित्रपटामध्ये तुम्हाला लव्ह ट्रँगल पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये 'मन उडू उडू झालं' या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पृथ्वी अंबर दिसणार आहे.

अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री आणिपृथ्वी अंबर यांचे प्रेम त्यांना आयुष्याच्या कोणत्या वळणावर नेणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. 'लाईफ इज फुल्ल ऑफ सरप्राइज अँड मिऱ्याकल्स.' अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे.

कॅनरस प्रोडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखन, संकलन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक अशोका के. एस. यांनी केले असून, सरी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच मराठीत पदार्पण करत आहेत. तर रिलायन्स एंटरटेनमेंटने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळली आहे.

त्रिकोणी प्रेमकथा असलेल्या 'सरी' या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अशोका के. एस. म्हणतात; "गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटाने घेतलेली भरारी मी पाहिली आहे. मी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत कार्यरत असलो, तरी मराठी चित्रपट आवर्जून पाहतो. त्यामुळेच मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची इच्छा होती. ती संधी मला 'सरी' या चित्रपटाद्वारे मिळाली आहे. प्रेक्षकांना ही प्रेमकथा नक्कीच भावेल."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heatwave Warning : राज्यात पुढील २ दिवस उष्णतेची लाट येणार, तापमान किती असेल ते पाहा!

Today's Marathi News Live : कोल्हापुरातील दोन्ही जांगावरील रणनीतीवर शिंदे, फडणवीसांची बैठक

Skin Care Tips: मान काळी झालीये? या घरगुती उपायांनी करा स्वच्छ

Jai Shree Ram Written in Exam : उत्तरपत्रिकेत 'जय श्रीराम' लिहिलं, विद्यार्थी ५६ टक्क्यांनी पास; नेमका घोळ कसा झाला उघड?

Hemant Godse On Onion News | खासदार हेमंत गोडसेंनी मानले सरकारचे आभार

SCROLL FOR NEXT