Jilbi Movie Announcement Instagram
मनोरंजन बातम्या

Jilbi Movie Announcement: ‘वडापाव’नंतर प्रसाद ओक बनवणार ‘जिलबी’, ‘या’ तारखेपासून घेता येणार आस्वाद

Jilbi Movie: ‘वडापाव’नंतर अभिनेता प्रसाद ओकचा ‘जिलबी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Chetan Bodke

Jilbi Movie Announcement

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता प्रसाद ओक सध्या आगामी चित्रपटांमुळे कमालीचा चर्चेत आहे. ‘धर्मवीर २’, ‘महापरिनिर्वाण’ आणि ‘वडा पाव’ या चित्रपटामुळे अभिनेता प्रसाद ओक प्रचंड चर्चेत आहे. अशातच प्रसाद ओक त्यांच्या आगामी चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसाद ओकने ‘वडा पाव’ या चित्रपटाची घोषणा केली होती. आता त्यानंतर लवकरच ‘जिलबी’ हा प्रसाद ओकचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत प्रसाद ओक आणि स्वप्निल जोशी झळकणार आहेत.

स्वप्नील आणि प्रसादने आपल्या मिश्किल स्वभावाने मनोरंजनाचा गोडवा कायमच वाढवला आहे. सध्या हे दोघंही ‘जिलबी’ चा मनमुराद आस्वाद घेताना दिसत आहेत. शूटिंग दरम्यान ‘कुछ मिठा हो जाये’ म्हणत या दोघांनीही जिलबीवर ताव मारलाय. आता हा ताव फक्त हे दोघेच मारणार नाहीत, तर त्याचा आस्वाद प्रेक्षकांनाही चाखता येणार आहे. सध्या चित्रपटाची शूटिंग सुरु असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप गुलदस्त्यात आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा व्हिडीओ नुकताच शेअर करण्यात आला आहे.

यावेळी प्रसादने प्लॅन बनवतानाचा चाहत्यांसोबत एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन कांबळे या दोघांची फिरकी घेताना दिसत आहेत. स्वप्नील आणि प्रसाद हे दोघेही ‘जिलबी’च्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत.

दोन गोड माणसं एकत्र आल्यावर चित्रपटाचा ‘गोडवा’ नक्कीच वाढणार असं दिग्दर्शक नितीन कांबळे सांगतात. रसिक प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत करायला चांगला विषय प्रेक्षकांसाठी घेऊन येत असल्याचे निर्माते आनंद पंडित यांनी सांगितले.

चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत प्रसाद आणि स्वप्नीलसोबतच शिवानी सुर्वे, पर्ण पेठे, गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या कलाकारांच्या भूमिका आहेत. कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला; भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या जवळच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या, घटनाक्रम आला समोर

मंत्री छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? राजकीय घडामोडींना वेग|VIDEO

मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर

West bengal CM Race: भाजपचं धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, महिला नेत्या अचानक दिल्लीत धडकल्या

लग्नाआधी वजन घटवण्याचं औषध? दिखाव्याच्या दुनियेत आरोग्याशी खेळ

SCROLL FOR NEXT