Ghar Bnaduk Biryani Poster Instagram/ @akashthosar
मनोरंजन बातम्या

Ghar Banduk Biryani Teaser Out: 'कधी ही न पाहिलेला' नागराज, आकाशचा लूक चर्चेत; चित्रपटाचा टीझर चर्चेत

चित्रपटाचे नाव 'घर बंदूक बिर्यानी' असून चित्रपटाचा भन्नाट टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ghar Banduk Biryani Teaser Out: दिग्दर्शक नागराज मंजुळे हे नाव उच्चारल्यावर प्रेक्षकांच्यासमोर सामाजिक विषयाचे चित्रपट नजरेसमोर येतात. प्रेक्षकांच्यासमोर नेहमीच दिग्दर्शक नागराज मंजुळे नव्या कलाकारांना संधी देत असतात. नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओज यांनी आतापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीला 'फॅंड्री', 'सैराट' आणि 'नाळ' चित्रपटाच्या माध्यमातून समाजाला नवे विषय दिले आहेत.

नागराज मंजुळेचे नाव उद्गारल्यावर आपसुकच झी स्टुडिओजचे ही नाव येते. या दोघांनीही प्रेक्षकांना दर्जेदार आशय दिले असून पुन्हा एकदा एक नवाकोरा आणि जबरदस्त चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.

चित्रपटाचे नाव 'घर बंदूक बिर्यानी' असून चित्रपटाचा भन्नाट टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओज निर्मित, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित चित्रपटात मुख्य भूमिकेत सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर हे कलाकार झळकणार आहेत. अद्याप तरी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख व कलाकार गुलदस्त्यातच आहे. चित्रपटात कोण कोण कलाकार झळकणार हे पाहण्यासाठी सर्वच प्रेक्षक आतुर आहेत.

चित्रपटाचा टीझर पाहून काहीतरी भन्नाट कलाकृती असल्याचे दिसून येत आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांची झुंज यात दिसत असून हा पाठलाग कशासाठी आहे ? हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. 'घर बंदूक बिर्यानी' चित्रपट २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट एकाचवेळी मराठी, हिंदी, तेलुगु भाषेत प्रदर्शित करणार आहेत.

या चित्रपटाबद्दल नागराज मंजुळे म्हणतात, " झी स्टुडिओजच्या साथीने पुन्हा एक आगळावेगळा चित्रपट घेऊन आलो आहे. सयाजी शिंदे यांच्यासारख्या दिग्गज कलाकारासोबत काम करण्याचा अनुभव अफाट होता. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आकाशसोबत काम करण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन आलोय. आशा आहे प्रेक्षक यालाही उत्तम प्रतिसाद देतील.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात

Ratnagiri : रत्नागिरीत भयंकर घडलं! सकाळी झोपेतून लवकर उठवल्याने सुनेची सटकली, सासूच्या डोक्यात फळी घातली नंतर...

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्यवसाय क्षेत्रात एन्ट्री; मुंबईजवळ सुरू केले हॉटेल, VIDEO चर्चेत

High Blood Pressure: रक्तदाब वाढण्यामागे फक्त मीठच नाही, या ६ चुका रोज करत असाल तर हृदयावर वाढतो मोठा ताण

धक्कादायक! कल्याणमध्ये महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या; 20 पीडितांची सुटका

SCROLL FOR NEXT