Hruta Durgule And Prathamesh Parab Saam Tv
मनोरंजन बातम्या

Delivery Boy: हृता दुर्गुळेची प्रथमेश परबसाठी ती खास पोस्ट चर्चेत, म्हणते 'डिलिव्हरी पोहचली का?'

Hruta Durgule And Prathamesh Parab: 'फुलपाखरू' आणि 'मन उडू उडू झालं' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकणारी हृता दुर्गुळेने मराठी सिनेसृष्टीत यशस्वीरित्या पाऊल टाकले

Priya More

Hruta Durgule Movie:

मराठी सिनेसृष्टीची (Marathi Film Industry) प्रसिद्ध अभिनेत्री हृता दुर्गळे (Hruta Durgule) सध्या या नाही तर त्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. 'फुलपाखरू' आणि 'मन उडू उडू झालं' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकणारी हृता दुर्गुळेने मराठी सिनेसृष्टीत यशस्वीरित्या पाऊल टाकले. आता ती एकापाठोपाठ एक जबरदस्त चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशामध्ये हृता दुर्गुळेची एक सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

अभिनेता प्रथमेश परबसाठी हृता दुर्गुळेने ही खास पोस्ट केली असून यामध्ये तिने '#deleviry पोहचली का?', असं प्रथमेशला विचारले आहे. आता याचा नेमका अर्थ काय होतो असा प्रश्न तिच्या आणि प्रथमेशच्या चाहत्यांना पडला आहे. हृताला नेमकं काय म्हणायचे आहे असं त्यांना वाटत आहे. अशामध्ये हे #deleviry दुसरं तिसरं काही नसून हृताचा आगामी चित्रपट आहे. हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परब लवकरच 'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सध्या सोशल मीडियावर ‘डिलिव्हरी बॅाय’ची जोरदार चर्चा सुरू आहे. याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये डिलिव्हरी बॉयचे नाव दिसत आहे. त्याच्यावर असलेल्या एका बॉक्समधून छोटसं बाळ बाहेर आल्याचे दिसत आहे. डिलिव्हरी बॉय घेऊन येतोय एंटरटेंमेंटची डिलिव्हरी अशी टॅगलाइन वापरण्यात आली आहे. आता हे बॅाक्समधील बाळ आणि डिलिव्हरी बॅायचा नेमका संबंध काय? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान हा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Hruta Durgule post

या चित्रपटामध्ये हृता दुर्गुळे, प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप, अंकिता लांडे पाटील हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊस निर्मित, सिनेपोलिस सिनेमा प्रस्तुत, मोहसीन खान दिग्दर्शित या चित्रपटाचे दीपा नायक प्रस्तुतकर्ता आहेत. तर डेव्हिड नादर निर्माते आहेत. राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओवेसींचा रामाला नमस्कार; व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Businessman: गाडीतून उतरताच धाडधाड फायरिंग, प्रसिद्ध व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या; मुलालाही असंच संपवलं होतं

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

NASA Warning: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? नासाचा मोठा इशारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT