Baipan Bhari Deva 30th Day Box Office Collection Saam TV
मनोरंजन बातम्या

Kedar Shinde Post : बाई पण भारी देवाची १०० कोटींकडे वाटचाल; केदार शिंदे म्हणतात, 'परमेश्वर प्रत्येक चित्रपट गृहात अवतरला...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Baipan Bhari Deva 30th Day Box Office Collection : केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ बॉक्स ऑफिस यशस्वी घोडदौड करत आहे. 30 जूनमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षक आवर्जून हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहत आहेत.

‘बाईपण भारी देवा’ चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना झाला आहे. एक महिन्यांनंतर देखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर स्वतःचे स्थान कायम ठेवले आहे. मराठी सिनेसृष्टीसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

केदार शिंदे यांनी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाविषयी नवीन अपडेट शेअर केली आहे. केदार शिंदे यांनी बाईपण भारी देवा चित्रपटचं बॉक्स ऑफिस कलेक्शन शेअर केले आहे. चित्रपटाने 30 दिवसात 70.20 कोटींची कमाई केली आहे.

केदार शिंदेंची पोस्ट

ही पोस्ट शेअर करत केदार शिंदे यांनी परमेश्वराचे आभार मानले आहेत. केदार शिंदे यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आपण न मागता परमेश्वर भरभरून देतो.. तो नेमका कोणत्या रूपात प्रकट होतो? ते कधीच कळत नाही.

यावेळी मात्र त्याचं रूप पाहिलं.. रसिक प्रेक्षकांच्या रूपातच परमेश्वर प्रत्येक चित्रपटगृहात अवतरला आणि पदरात दान टाकून गेला.. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. परमेश्वर साथ सोडणार नाहीच, याची खात्री आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री सिद्धिविनायक महाराज की जय.’ (Latest Entertainment News)

केदार शिंदे यांच्या पोस्टवर अनेक मराठी प्रेक्षक कमेंट करून त्यांचे अभिनंदन करत आहेत. तसेच चित्रपट 100 कोटींचे कलेक्शन करो, अशी इच्छा व्यक्त करत आहेत.  

बाईपण भारी देवा चित्रपटामध्ये महिलांचा त्यांच्या जीवनातील संघर्ष दाखविण्यात आला आहे. सहा बहीणींची कथा असलेला हा चित्रपट अनेकांच्या मनाला स्पर्शून गेला आहे.

या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सूचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दिपा सावंत चौधरी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT