Siddharth Jadhav Parents Abroad Trip Instagram
मनोरंजन बातम्या

Siddharth Jadhav Parents Abroad Trip: 'शाळेतल्या पहिल्या सहिलीपासून ते आतापर्यंत...';आई - बाबांच्या पहिल्या परदेश दौऱ्यानिमित्त सिद्धूने केलेली पोस्ट चर्चेत

Siddharth Jadhav News: कायमच अभिनयामुळे चर्चेत राहिलेला सिद्धू यावेळी देखील एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे.

Chetan Bodke

Siddharth Jadhav Parents Abroad Trip: अभिनेता सिद्धार्थ जाधव कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतो. सिद्धार्थ जाधवने त्याच्या सिनेकारकिर्दित जत्रा, बकुळा नामदेव घोटाळे, हुप्पा हुय्या, दे धक्का या मराठी चित्रपटांसोबतच गोलमाल, सिंबा, सर्कस या बॉलिवूड चित्रपटातूनही त्याने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहिलेला सिद्धू यावेळी देखील एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे.

प्रत्येक मुलगा आपल्या आई- वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करत असतो. आई- वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलं कायमच प्रयत्न ही करत असतात. नुकतंच अभिनेता सिद्धार्थ जाधव याने आपल्या आई- वडीलांचे एक स्वप्न पूर्ण केलंय. त्यामुळे तो चर्चेत राहिला. नुकतंच सिद्धूने त्याच्या आई- वडीलांना पहिल्यांदाच परदेश वारीला पाठवलंय.

अभिनेता सिद्धार्थ जाधवने आई-वडील परदेशात फिरायला गेल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. सिद्धार्थने फेसबुकवरून फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिलीय. यावेळी अभिनेत्याने माझी काळजी करून नका, तुम्ही सुट्टीचा आनंद लुटा, असं म्हणत त्याने आई- वडीलांच्या परदेशवारीबद्दल आनंद व्यक्त केलाय. सध्या अभिनेत्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, “This is the “moment ” ... आई बाबांचा पहिला परदेश दौरा... माझ्यासाठी हा क्षण किती महत्त्वाचा आहे, हे मी शब्दात नाही सांगू शकत... त्यांच्या आशिर्वादाने “मी जग बघायला फिरलो” आणि आज त्यांच्याच आशिर्वादाने “मी त्यांना जग बघायला पाठवतोय...” त्यातला आज त्यांचा हा “पहिला प्रवास...” माझ्या शाळेतल्या पहिल्या सहली पासून ते आतापर्यंत लंडनला शूटला जाईपर्यंत जी एक्साईटमेंट, आनंद, त्यांना असायचा तशीच किंवा त्यापेक्षा जास्त एक्साईटमेंट,आनंद आज मला वाटतोय.... ते मला जे नेहमी सांगायचे तेच आज मी त्यांना सांगतोय.. तुम्ही मज्जा करा.. माझी काळजी नको.. मी आहे तुमच्यासोबत.....”

अभिनेत्याच्या ह्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे. एक युजर म्हणतो, आई बाबांना सुखात ठेवणं ह्या सारखं कुठलच सुख नाही.... अशीच त्यांची स्वप्न पूर्ण कर, लव्ह यू सिद्धू, तर आणखी एक युजर म्हणतो, हा क्षण प्रत्येक मुलाने आपल्या आई- वडिलांच्या आयुष्यात आणावा... तर आणखी एक युजर म्हणतो, सिद्धू, आई बाबांची सेवा, स्वप्न पूर्ण करणे हीच खरी कमाई, कायमच तुझ्या पाठीशी आमचे आशिर्वाद आहेत. अशा अनेक प्रतिक्रिया त्याला नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT