Marathi language rule auto rickshaw strike dhananjay powar Saam tv
मनोरंजन बातम्या

Marathi compulsory: 'आमच्या भाषेच्या विरोधात रस्त्यावर येत असाल, तर…'; अमराठी रिक्षाचालकांवर संतापला आणखी एक मराठी अभिनेता

Marathi compulsory: रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयावरून राज्यात वाद वाढला आहे. संपाच्या इशाऱ्यावर कलाकार धनंजय पवार आणि उत्कर्ष शिंदे यांनी सोशल मीडियातून स्पष्ट प्रतिक्रिया दिली.

Shruti Vilas Kadam

Marathi compulsory: राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून सध्या मोठा वाद पेटला आहे. १ मेपासून हा नियम लागू करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असून, मराठी येत नसल्यास परवाना रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यामुळे रिक्षा-टॅक्सी चालक संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी ४ मे रोजी राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर मराठी कलाविश्वातील कलाकारही पुढे येत आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. अभिनेता- दिग्दर्शक हेमंत ढोमेनंतर दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि गायक-कलाकार उत्कर्ष शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर आपले मत मांडले आहेत. तर आता बिग बॉस फेम अभिनेता धनंजय पवार याने देखील या विषयावर आपले मत मांडत एक मराठी भाषेचा सन्मान राखला गेला पाहिजे, असे ठामपणे नमूद केले आहे.

धनंजय पवारने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट शब्दांत सांगितले की, 'आज १५,००,०००/- लोक रस्त्यावर येत आहेत ते त्यांच्या रोजीरोटीसाठी… त्यांच्या हक्कांसाठी… त्यांच्या हक्कासाठी मराठी लोक उभे राहतील. पण आमच्या भाषेच्या, आमच्या अस्मितेच्या विरोधात जर तुम्ही रस्त्यावर येत असाल, तर तो आमच्या मराठी अस्मितेचा अनादर असेल आणि असे असेल तर तुमची आमच्या महाराष्ट्राला कोणतीही गरज नाही. आजपर्यंत महाराष्ट्रात संघर्षाचा इतिहास आहे आणि तो संघर्ष आमच्यासाठी रोजचा घटक आहे.'

दरम्यान, या निर्णयाविरोधात रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परवाने रद्द करण्याच्या भीतीमुळे हजारो चालकांच्या उपजीविकेवर परिणाम होईल, असा दावा संघटनांकडून केला जात आहे. त्यामुळे ४ मेपासून राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

सरकारच्या या निर्णयामागे प्रवाशांशी संवाद सुलभ करणे आणि मराठी भाषेला प्रोत्साहन देणे हा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या मुद्द्यावरून समाजात दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. काही जण या निर्णयाचे समर्थन करत आहेत, तर काही जण त्याला विरोध करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT