Ajinkya Nannaware And Rutuja Bagwe Films Instagram
मनोरंजन बातम्या

Ajinkya Nannaware And Rutuja Bagwe Films: अजिंक्य- ऋतुजाची जोडी पुन्हा जमली, दिसणार ‘या’ चित्रपटामध्ये

Songya Film: ‘सोंग्या’ चित्रपटाच्या निमित्ताने अजिंक्य- ऋतुजाची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

Chetan Bodke

Songya Film

अभिनेत्री ऋतुजा बागवे सध्या तिच्या अभिनयामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ‘अंकुश’ चित्रपटामुळे चर्चेत होती. आता त्यानंतर आगामी चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लवकरच ऋतुजा बागवे ‘सोंग्या’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्यासोबत अभिनेता अजिंक्य ननावरे ही दिसणार आहे. ‘सोंग्या’ चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहे.

मिलिंद इनामदार दिग्दर्शित ‘सोंग्या’ चित्रपट येत्या १५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. निशांत काकिर्डे, राहुल पाटील, मिलिंद इनामदार या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे तर, सामाजिक बंधनाखाली स्त्रियांची होणारी घुसमट यावर चित्रपट भाष्य करतो. आजही अनेक चुकीच्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात. या चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा देणारा हा चित्रपट आहे. (Marathi Film)

चित्रपटात आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम केले असले तरी याआधीही नाटकात आम्ही एकत्र काम केलं आहे. आमच्यामध्ये चांगली मैत्री आणि बॉण्डिंग होतं त्याचा फायदा आम्हांला ‘सोंग्या’ चित्रपटातील आमच्या भूमिका करताना नक्की झाला, अशा भावना ऋतुजा आणि अजिंक्यने व्यक्त केल्या. (Marathi Actors)

चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत, ऋतुजा बागवे, अजिंक्य ननावरे, गणेश यादव, अनिल गवस, प्रदीप डोईफोडे आदि कलाकार चित्रपटात आहेत चित्रपटाची कथा पटकथा दिपक यादव यांची आहे. गीतलेखन गुरु ठाकूर यांनी केले आहे.

संगीत विजय गवंडे यांचे आहे. निरामि फिल्म्सची निर्मिती असलेला मिलिंद इनामदार दिग्दर्शित ‘सोंग्या’ चित्रपट येत्या १५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. निशांत काकिर्डे, राहुल पाटील, मिलिंद इनामदार या चित्रपटाचे निर्माते आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai: भारताच्या स्टार क्रिकेटपटूला अंडरवर्ल्डकडून धमकी, ५ कोटींच्या खंडणीची मागणी

Maharashtra Live News Update: महावितरणचे राज्यव्यापी संप सुरू

फरहानानंतर कोण बनला 'Bigg Boss 19'च्या घराचा नवा कॅप्टन?

Navapur : आश्रम शाळेतील सहा वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू; नवापूर तालुक्यातील घटनेने खळबळ

म्हाडाची बंपर ऑफर! मुंबईतील प्राईम लोकेशनवरील घरांची थेट विक्री, घरे भाड्यानं देण्यासही तयार

SCROLL FOR NEXT