Jitendra Joshi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jitendra Joshi: एखाद्या भाषेची आवड लागली की..., अमराठी जितेंद्र जोशीने सांगितली मराठीची सोपी व्याख्या

Sa Re Ga Ma Pa Li'l Champs: झी मराठीवरील प्रसिद्ध रियालिटी शो 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मध्ये चित्रपटाच्या प्रमोशसाठी आलेल्या जितेंद्र जोशीने तो नेमका कोण आहे हे सांगितलं.

Priya More

Naal 2 Movie:

मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) हा सध्या चांगलाच चर्चेत आहे त्यामागचे कारण म्हणजे 'नाळ 2' चित्रपट. जितेंद्र जोशी नुकताच या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक केले जात आहे. आपल्या दमदार अभिनयाद्वारे तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो.

मराठी भाषेवर प्रेम आणि भाषेची अचूक जाण असलेला जितेंद्र जोशी हा मराठी नाही हे खूप कमी लोकांना माहिती आहे. नुकताच झी मराठीवरील प्रसिद्ध रियालिटी शो 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मध्ये चित्रपटाच्या प्रमोशसाठी आलेल्या जितेंद्र जोशीने तो नेमका कोण आहे हे सांगितलं. यासोबतच त्याने प्रेक्षकांना मराठीचे महत्व आणि अनोखी व्याख्या सांगितली.

झी मराठीने नुकताच सारेगमप लिटिल चॅम्प्सचा प्रोमो शेअर केला. यामध्ये हा कार्यक्रम होस्ट करणारी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांना आणि प्रेक्षकांना सांगते की, 'आज तुमच्यामध्ये सुद्धा एक असा कलाकार आहे जो आपल्याला वाटतो या मातीमध्येच म्हणजेच तो मराठीच्या मांडीवरच बहुतेक हे लेकरू जन्माला आला आहे. पण फार कमी लोकांना माहित आहे की तो मराठी नाही पण तो अमराठी आहे. आणि त्याचं नाव आहे जितेंद्र जोशी.'

त्यानंतर जितेंद्र जोशी सांगतो की, 'मी जन्माने मारवाडी आहे. मी अमराठी नाही तर मी मराठीच आहे. राजस्थानात जन्माला आलेला मुसलमान राजस्थानी असतो. तसाच महाराष्ट्रात जन्माला आलेला मारवाडी हा मराठी असतो. पण फक्त एकच आहे की घरामध्ये मराठी बोललं जात नव्हतं. त्यामुळे घरातली जी भाषा असते ती तुमची भाषा असते. कारण तुम्ही जास्तीत जास्त त्या लोकांबरोबर बोलत असता. मग इथं मुंबईत आल्यानंतर मला लक्षात आलं की, जर या क्षेत्रात काम करायचं असेल तर भाषा खूप महत्त्वाची आहे. त्याच्यावरून हिणवलं गेलं. अन् मी शिकलो.'

जितेंद्र पुढे सांगतो की, जेव्हा गाणं असेल किंवा कुठली कला असेल. कविता असू किंवा ज्याच्यामध्ये आंतरभाव असतो. तेव्हा रोजच्या जगण्यातील भाषा नसेल. आपले आई-वडील ते बोलत नसलीत तर काय होतं ते मला ठाऊक आहे. पण असं होतं की एकदा एखाद्या भाषेची आवड लागली की कोणतीही भाषा परकी राहत नाही.'

तसंच, 'आताची मुलं मला येऊन भेटतात आणि म्हणतात, तुमचं मराठी काय सॉलिड आहे. तर मी त्यांना म्हणतो, माझी मराठीची समज चांगली आहे. माझं मराठीचं ज्ञान नाहीये. मराठीचं ज्ञान पाहायचं असेल तर खूप माणसं आहेत. माझी समज चांगली आहे, मला मराठी आवडते. ही माझी भाषा आहे. कारण मला असं वाटतं, की छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हटल्यानंतर जो जय म्हणतो आणि ज्याच्या अंगावर काटा फुलतो तो मराठी. एवढी साधी व्याख्या आहे मराठीपणाची.', असं म्हणत त्याने मराठी भाषेची सोपी भाषा सर्वांना सांगितली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manache Ganpati : बाप्पाच्या आगमनाची वेळ ठरली! पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी विराजमान होणार? वेळ आणि पथकांची यादी एका क्लिकवर

Maharashtra News Live Update: पुण्यातील जांभूळवाडी येथील पुलावर भीषण अपघात

Sanjay Gaikwad : बाईबद्दलच्या त्या वक्तव्यानं आमदार संजय गायकवाड अडचणीत; मध्यरात्री थेट गुन्हा दाखल

IAS Officer ला सस्पेंड करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? राज्य की केंद्र सरकार?

Daughter Property Rights : मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा कधी मिळत नाही? काय आहेत नियम, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT