Hemangi Kavi Shared 30 Year old Photo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hemangi Kavi: हेमांगी कवी खूपच बदलली, ३० वर्षांपूर्वी दिसायची अशी; वयाच्या गणितावरून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Chetan Bodke

Hemangi Kavi Shared 30 Year old Photo

मराठी सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सध्या कमालीची चर्चेत आहे. कायमच आपल्या विधानांमुळे, फॅशनमुळे आणि अभिनयामुळे चर्चेत राहणारी हेमांगी सध्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. हेमांगीने नुकतंच इन्स्टाग्रामवर तिचा ३० वर्ष जुना एक फोटो शेअर केलेला आहे. तिच्या त्या फोटोवरून आणि पोस्ट शेअर करताना दिलेल्या कॅप्शनवरून तिला वयाचं गणित नेटकऱ्यांनी समजून सांगितलं आहे. नेटकऱ्यांनी हेमांगीला काही वयावरून सवाल उपस्थित करत तिला ट्रोल केले आहे. (Marathi Actress)

नुकतंच हेमांगीने सोशल मीडियावर तिचा लहानपणीचा एक फोटो आणि तिचा आताचा एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. लेटेस्ट व्हिडीओमध्ये हेमांगी रेड कलरच्या मोनोकिनी अर्थात स्विम सुट परिधान केलेला दिसत आहे. हेमांगीने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिले की, "पहिल्या फोटोमध्ये आणि शेवटच्या व्हिडीओमध्ये फक्त ३० वर्षांचे अंतर आहे." असे ती व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हणते. सध्या तिच्या ह्या कॅप्शनची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. (Social Media)

हेमांगी या व्हिडीओमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची भुरळ अनेकांना पडली आहे. अभिनेत्रीच्या सौंदर्याचे फक्त चाहत्यांनीच नाही तर अनेक सेलिब्रिटींनीही कौतुक केले आहे. 'उफ्फ... तुझी अदा असे निराळी, परी म्हणू की सुंदरा... ही मेनका ही मेनका....', 'जस्ट लूकिंग लाईक अ वाव', 'तुझ्या सौंदर्याला अन् तुझ्या अभिनयाला कसलीच तोड नाही' असं म्हणत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. तर 'पहिल्या फोटोत तू ५ वर्षांची दिसत नाहीस...' अशा अनेक वेगवेगळ्या कमेंट्स करत तिला ट्रोल केलं आहे. हेमांगीच्या नव्या रिलला एक हजारांहून अधिक चाहत्यांनी लाईक्स केले आहे. तर १५ हजारांहून अधिक चाहत्यांनी व्हिडीओ चाहत्यांनी पाहिला. (Tv Serial)

मराठी प्रेक्षकांना हसवल्यानंतर आता हेमांगी कवी हिंदी प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. ती 'मॅडनेस मचाएंगे, इंडिया को हंसाएंगे' (Madness Machayenge India Ko Hasayenge) या कॉमेडी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT