Baipan Bhaari Deva 22nd Day Collection Instagram
मनोरंजन बातम्या

Baipan Bhaari Deva 22nd Day Collection: सलग चौथ्या आठवड्यात ‘बाईपण भारी देवा’ची सुसाट कामगिरी, २२व्या दिवशीही करतोय कोट्यवधींची कमाई

Chetan Bodke

Baipan Bhaari Deva 22nd Day Box Office Collection: केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एका महिन्यातच ५० कोटींचा टप्पा पार केलाय. गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या कलाकारांसह निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी सक्सेस पार्टीचं आयोजन केलं होतं.

चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहता कलाकारांसह चित्रपटाची सर्वच टीम भारावून गेली आहे. हा चित्रपट गेल्या ३० जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित होताच अवघ्या काही दिवसांमध्येच या चित्रपटाने कोट्यवधींचा पल्ला गाठला होता. चला तर जाणून घेऊया चित्रपटाने २२ व्या कशी कमाई केली आहे.

महिलांवर चित्रित केलेल्या या चित्रपटाने महिनाभरातच अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत स्वत:च्या नावावर नवीन रेकॉर्ड बनवला आहे. ‘बाईपण भारी देवा’चा बॉक्स ऑफिसवर आता चौथ्या आठवड्यातही कमाईचा आलेख कसा आहे, हे जाणून घेण्यासाठी सर्वच प्रेक्षक उत्सुक आहेत. ब्लॉकबस्टर ठरलेला हा चित्रपट कथा, अभिनय आणि गाण्यांमुळे बराच चर्चेत राहिला आहे. सेलिब्रिटींसकडून, चित्रपट समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून आपल्या कामाची पोचपावती मिळवली.

जया, शशी, साधना, चारु, केतकी आणि पल्लवी या सहा बहिणींची कथा असलेला चित्रपट पाहताना प्रत्येक स्त्री स्वत:सोबत रिलेट करतात. चित्रपटाला सलग चौथ्या आठवड्यातही चांगलाच भरघोस प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या आठवड्यात १२.५० कोटी, दुसऱ्या आठवड्यात २४.८५ कोटी, तिसऱ्या आढवड्यात २१.२४ कोटी तर या चित्रपटाने २२ व्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी १.२५ कोटींची कमाई केली आहे.

चित्रपटाविषयी बोलायचे तर, जिओ स्टुडिओ निर्मित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने प्रत्येक स्त्रीला जगायलं शिकवलं आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्री आहेत. माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट गेल्या ३० जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT