Baipan Bhaari Deva 1st Weekend Box Office Collection Instagram
मनोरंजन बातम्या

Baipan Bhaari Deva 1st Weekend Collection: बॉक्स ऑफिसवर ‘बाईपण भारी देवा’ सुसाट, पहिल्याच विकेंडला केली कोट्यावधींची कमाई...

Baipan Bhaari Deva Film Collection: चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्या आठवड्यात चित्रपटाने किती कोटींची कमाई केली, चला तर जाणून घेऊया.

Chetan Bodke

Baipan Bhaari Deva 1st Weekend Box Office Collection: केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट गेल्या ३० जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी विशेषत: महिला वर्ग फारच उत्सुक होत्या. चित्रपटाला प्रेक्षकांकडून अनपेक्षितरित्या चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्या आठवड्यात चित्रपटाने किती कोटींची कमाई केली, चला तर जाणून घेऊया.

चित्रपटाने पहिल्या विकेंडला दिलासादायक कमाई केली असून चित्रपटाची सोशल मीडियावर बऱ्यापैकी चर्चा सुरू आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६.४५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. २०२३ मधील आजवरची रेकॉर्ड ब्रेक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी हा चित्रपट आहे. प्रेक्षकांना चित्रपटाचे कथानक, गाणी, दिग्दर्शन आणि कलाकारांचा अभिनय फारच भावला आहे. चित्रपटाने फार कमी वेळातच प्रेक्षकांचे प्रेम मिळवले.

चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. केदार शिंदेंनी सोशल मीडियावर या चित्रपटाने पहिल्या विकेंडलाच किती कोटींची कमाई केली, याबद्दलचा आकडा शेअर केला आहे. केदार शिंदे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले, “ही स्वामींची कृपा. हा सिध्दीविनायकाचा महाप्रसाद. मला २१ वर्ष लागली दादरचा एक रस्ता क्रॉस करायला! २००२ साली सही रे सही आलं. त्याला तुम्ही मायबाप प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.”

पुढे आपल्या पोस्टमध्ये केदार शिंदे म्हणतात, “गेली कित्येक वर्ष त्याचे “हाऊसफुल्ल” चे बोर्ड मी पाहातो आहे. त्यानंतर अनेक नाटकं, सिनेमे यालाही भरभरून प्रतिसाद दिलात. अगं बाई अरेच्चा, जत्रा ते महाराष्ट्र शाहीर पर्यंतच्या प्रवासात तुमची साथ लाखमोलाची ठरली. मात्र खऱ्या अर्थाने “सही” नंतर ‘बाईपण भारी देवा’ चं हे यश पाहत आहे. याला फक्त तुम्हीच कारणीभूत आहात. मी काम अविरतपणे सुरू ठेवेन. तुम्ही मात्र सोबत राहा. खुप भावना व्यक्त करायच्या आहेत. पण योग्य वेळी नक्कीच करीन.”

जिओ स्टुडिओ निर्मित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने प्रत्येक स्त्रीला जगायलं शिकवलं आहे. या चित्रपटात ६ गुणी अभिनेत्रींनी अभिनय केला आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्री आहेत. माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट आपल्या भेटीसाठी सज्ज झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जालन्यातील कुंभार पिंपळगावमध्ये रस्ता रोको

पेपरफुटीविरोधात उद्रेक! MPSC सचिवांच्या तोंडाला काळं फासलं, पुण्यात गदारोळ

Online Shopping: ‘50% OFF’ पाहून वस्तू घेण्याआधी थांबा! आता बदलणार डिस्काउंटचा नियम

How To Create 80s Retro Photo: कोणताही Prompt न वापरता बनवा 80s च्या काळातील Vintage फोटो; AIचा नवा ट्रेंड व्हायरल

Sweet Corn Soup Recipe: संध्याकाळच्या भूकेसाठी झटपट घरी बनवा गरमागरम स्वीट कॉर्न सूप; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT