Mangesh Desai In Ankush Movie Instagram
मनोरंजन बातम्या

Mangesh Desai In Ankush Movie: 'अंकुश'मध्ये मंगेश देसाई दिसणार नव्या भूमिकेत, रावडी लूक पाहून चित्रपटाची उत्सुकता शिगेला

Mangesh Desai New Film: आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारा अभिनेता मंगेश देसाई अंकुश या चित्रपटात दमदार भूमिकेत दिसणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mangesh Desai New Marathi Film

आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारा अभिनेता मंगेश देसाई अंकुश या चित्रपटात दमदार भूमिकेत दिसणार आहे. साजनभाई असं नाव असलेल्या या भूमिकेतील रावडी लूक लाँच करण्यात आला असून ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या माध्यमातून राजाभाऊ घुले अंकुश या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीमध्ये धडाकेबाज पदार्पण करत आहेत. "अंकुश" हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.

"अंकुश" चित्रपटाचा थरारक टीजर नुकताच लाँच करण्यात आला. या टीजरला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद लाभत आहे. या चित्रपटात केतकी माटेगावकर एका करारी भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासह आता मंगेश देसाईच्या साजनभाई या भूमिकेचा रावडी लूक समोर आला आहे.

मंगेश देसाईनं आजवर त्याच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका आपल्या सशक्त अभिनयानं सजवली आहे. त्यामुळेच मराठीतील कसदार अभिनेत्यांमध्ये मंगेशचं नाव आवर्जून घेतलं जातं. मल्टिस्टारकास्ट असलेल्या या चित्रपटातून अभिनेत्री केतकी माटेगावकर, अभिनेता मंगेश देसाई यांच्यामुळे अंकुश चित्रपटातील एकाहून एक सरस कलाकार आता समोर येऊ लागले आहेत . त्यामुळे चित्रपटाविषयीचं कुतूहल दिवसेंदिवस वाढतंच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Taloda News : बोगस खत विक्रीचा पर्दाफाश; तळोदा तालुक्यात तीन लाखांचे बोगस खत जप्त

Shocking News : शेतजमिनीसाठी बनला हैवान; आईच्या हत्येनंतर मुलानं स्वत:लाही संपवलं

Lazy People: आळशी लोकांमध्ये असताता या सात सवयी, तुमच्याही सवयी अशा आहेत का?

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये विमानतळ पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगाराला घेतलं ताब्यात

Raksha Bandhan 2025: प्रत्येक भावाने बहिणीसाठी कराव्यात या ५ गोष्टी

SCROLL FOR NEXT