Kedar Shinde Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kedar Shinde: दिग्दर्शक केदार शिंदेंच्या सोशल मीडियावर हॅकर्सचा डल्ला, चाहत्यांना दिला सावध राहण्याचा सल्ला

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांच्या कलाकृतींनी नेहमीच प्रेक्षकांना थक्क करण्याचा प्रयत्न करत असतात.

Chetan Bodke

Kedar Shinde: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांच्या कलाकृतींनी नेहमीच प्रेक्षकांना थक्क करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचे सर्वच चित्रपट वेगवेगळ्या धाटणीचे असल्याने प्रेक्षक त्यांचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक एकच गर्दी करतात. नेहमीच दिग्दर्शक केदार शिंदे सोशल मीडियावर सक्रिय असतात. सध्या केदार शिंदेचा 'महाराष्ट्र शाहिर' हा चित्रपट सध्या बराच चर्चेत असलेला चित्रपट आहे.

केदार नेहमीच सोशल मीडियावरुन चित्रपटाविषयी किंवा खासगी आयुष्याबद्दल काही खास माहिती शेअर करतात. पण आता त्यांनी आपल्या चाहत्यांना एक वाईट बातमी शेअर केल्याने सर्वत्र चर्चेत आहे. त्यांची वाईट बातमी म्हणजे, दिग्दर्शक केदार शिंदेंचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. याविषयी त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

केदार शिंदेंनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, 'नमस्कार, काल रात्री माझं फेसबुक अकांऊंट हॅक झालं आहे. यामध्ये पर्सनल आणि पेज दोन्हीही हॅक झाले. त्यामुळे त्या अकाउंटवर माझा काहीच कंट्रोल नाही. त्यामुळे या दोन्ही अकाउंटद्वारे तुमच्याशी कोणताही संपर्क किंवा संवाद साधला जात असेल तर सावधान. कुठल्याही प्रकारचे रिप्लाय अथवा मेसेज करु नका'.

यामध्ये केदार शिंदे यांनी सावध रहा, सतर्क रहा असे आवाहन नेटकऱ्यांना केले आहे. याआधी ही बऱ्याच अभिनेत्यांसोबत असा किस्सा घडला आहे. त्याने चाहत्यांना सतर्क राहण्याचेही आवाहन केले आहे.

'जत्रा', 'अगं बाई अरेच्चा', 'खोखो' यांसारखे दर्जेदार चित्रपट आणि अनेक नाटकं, लोककला या माध्यमातून रसिकांचे अविरत मनोरंजन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dog Health Tips: कुत्रा आजारी पडल्यावर कसे समजते? जाणून घ्या 'हे' संकेत

Maharashtra Live News Update : शिक्षण मंत्र्यांच्या शेजारच्या जिल्ह्यातच शिक्षण व्यवस्थेचे वाजले तीन तेरा...

Panjiri Recipe : पंजिरी रेसिपी पावसाळ्यात ठरेल सगळ्यात ठरेल

Mira Bhayandar Morcha: म.. मराठीचा, म.. मीरा भाईंदरचा! विरोधाला न जुमानता मराठी माणूस एकवटला | VIDEO

घराबाहेर खेळताना चिमुकलीला ऑटेने उडवले, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT