Avinash-Aishwarya Narkar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Avinash-Aishwarya Narkar : पाडव्यानिमित्त ऐश्वर्या-अविनाश यांचा 'शातांबाई' गाण्यावर भन्नाट डान्स; VIDEO पाहून पोट धरून हसाल

Avinash-Aishwarya Narkar Padwa Special Dance : पाडव्यानिमित्त ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी खास डान्सची रील पोस्ट केली आहे. या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Shreya Maskar

मराठी क्युट कपल अविनाश नारकर (Avinash Narkar) आणि ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) कायमच प्रेक्षकांचे आवडते आहेत. त्यांनी मनोरंजन विश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निमार्ण केली आहे. आजवर या दोघांनी अनेक मालिका,नाटक आणि चित्रपटात काम केलं आहे. सध्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत दिसत आहेत.

अभिनेता अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ही दोघ नेहमी सोशल मीडियावर डान्सचे भन्नाट रील पोस्ट करत असतात आणि चाहत्यांना हे रील देखील खूप आवडतात. हे डान्स रील पाहून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होते. डान्ससाठी या जोडप्याची चांगलीच हवा सोशल मीडियावर पाहायला मिळते. यांची एनर्जी तरुणांनाही लाजवेल.

दिवाळीच्या मुहूर्तावर विशेषता पाडव्यानिमित्त या दोघांनी एक भन्नाट रील सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. 'शांताबाई' या गाण्यावर अविनाश-ऐश्वर्याने जबरदस्त डान्स केला आहे. अविनाश यांनी या पोस्टला एक हटके कॅप्शन देखील दिले आहे. "पाडव्या निमित्त नवऱ्याने केली अशी स्तुती!" असे भन्नाट कॅप्शन त्यांनी रीलला दिले आहे. ही रील खास या कपलने पाडव्यानिमित्त बनवली आहे. रीलमध्ये अविनाश यांनी पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट आणि निळी जीन्स परिधान केली आहे. तर ऐश्वर्या नारकरनी यांचे हिरव्या रंगाच्या साडीत सौंदर्य खुललं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT