Arun Kadam Wife Trolled ItMajja
मनोरंजन बातम्या

Arun Kadam: "तू याच्याशी लग्न का करतेस?" दिसण्यावरुन अरुण कदमांच्या पत्नीला कुटुंबानेच केलं होतं ट्रोल

Arun Kadam Wife Trolled: हास्यजत्रा फेम मराठी विनोदवीर अरुण कदम आणि त्यांची पत्नी वैशाली कदम यांना त्यांच्या रुपावरुन ट्रोल केलं जातं. विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबियांकडून देखील त्यावर टिप्पणी केली जाते, असं वैशाली कदम यांनी एका वृत्तसमुहाच्या कार्यक्रमात सांगितलं.

Bharat Jadhav

अफलातून कॉमेडी आणि अचूक असं विनोदाचं टाईमिंग साधणारे अभिनेते म्हणजे अरुण कदम. त्यांनी अनेक कॉमेडी शोमधून प्रेक्षकांना पोट धरून हसवलं. प्रेक्षकांना आपल्या अभिनय आणि विनोदी संवादामुळे लोकांना त्याचे दु: ख विसारयला ते लावतात. मात्र अरुण कदम यांच्या पत्नीला कुटुंबियांनीच त्यांना ट्रोल केलं होतं, याची सल त्यांनी एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलून दाखवली.

अरुण कदम आणि त्यांची पत्नी वैशाली कदम यांनी नुकतीच लोकमतच्या फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी बोलतांना अरुण कदम यांच्या दिसण्यावरुन वैशालीला त्यांच्याच कुटुंबियांनी ट्रोल केल्याची माहिती त्यांनी दिली. आपल्या कुटुंबियांनी आपल्या जोडीदारावर टीका केल्याने त्या दु:खी झाल्याचं त्यांनी या कार्यक्रमात बोलून दाखवलं.

सुंदर दिसणाऱ्या वैशाली कदम यांना अरुण कदम यांच्याबरोबर लग्न केल्यामुळे हिणवण्यात आलं होतं. आमच्या दिसण्यावरुन आम्हाला खूप ट्रोल केलं जातं. पूर्वी जेव्हा मी अरुण कदमशी लग्न करायला होकार दिला होता. तेव्हादेखील आम्हाला ट्रोल केलं गेलं आणि आताही केलं जातं, असं वैशाली कदम यांनी सांगितलं. पू्र्वी आम्ही बैठ्या चाळीत राहात होतो. तेव्हा मला खूप जण बोलायचे की तू हे लग्न का करतेस? तू छान दिसतेस. तुला अजून छान मुलगा मिळू शकतो", असं इतर लोक आपल्याला बोलत असल्याचं वैशाली यांनी सांगितलं.

कुटुंबीय आणि बाहेरचे सुद्धा मला याबाबत बोलत. पण फक्त माझे वडील या मतावर ठाम होते की हा मुलगा तुला सुखी ठेवेल. मी फक्त त्यांचं वाक्य लक्षात ठेवलं होतं. कोणी काही बोललं तरी मी लक्ष द्यायचे नाही, असं आपण ठरल्याचं वैशाली म्हणाल्या.

टीकाकारांना उत्तर काय द्यायचे असा प्रश्ना केल्यानंतर त्या म्हणाल्या, मी म्हणायचे की एखादा सुंदर मुलगा असले आणि त्याने अर्धवट संसार मोडून मला सोडलं. तर त्याला जबाबदार कोण? किंवा तो देखणा असेल पण कमवतच नसेल, तर, असं उत्तर त्या ट्रोल करणाऱ्यांना देत. दरम्यान काही दिवसापूर्वी त्यांची सुकन्या आई झाली आहे. अरुण कदम त्यांच्या नातवाबरोबरचे व्हिडिओ शेअर केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT