Sagar Karanda SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sagar Karanda : "स्त्री पात्र करणार नाही...", विनोदवीर सागर कारंडेच्या 'त्या' पोस्टनं वेधलं लक्ष

Sagar Karanda Post : मराठी अभिनेता आणि कॉमेडियन सागर कारंडे सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पोस्टमध्ये नेमकं काय आहे, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'चला हवा येऊ द्या' मधून प्रेक्षकांच्या घरोघरी पोहोचलेला कॉमेडियन सागर कारंडे (Sagar Karanda) कायमच त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. त्याच्या 'स्त्री' पात्राने तर चाहत्यांच्या मनात घर केले आहे. सागर कारंडेने आपल्या विनोदी शैली आणि अभिनयाच्या जोरावर मनोरंजनसृष्टीत स्वतःची ओळख तयार केली आहे.

सागर कारंडेने आपल्या अभिनयाने चाहत्यांना खूप हसवले आहेत. त्यांनी अनेक नाटक देखील केली आहेत. त्याचा अभिनय लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच वेड लावणार आहे. हरहुन्नरी सागर कारंडे आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने लिहिलं की,"यापुढे स्त्री पात्र करणार नाही" त्याच्या या पोस्टने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

पोस्टच्या खाली कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मात्र या निर्णयामागे सागरचे नेमकं कोणते कारण आहे. याचा अद्याप खुलासा झाला नाही आहे. सागरच्या पोस्टवर तुम्ही "कोणतंही पात्र करा ते भारीच असतं", "पण का?", "तुम्ही स्त्री पात्रात छान दिसता", "तुमचा विनोद लय भारी", "तुमच्या स्त्री पात्रांनी आम्हाला हसवलंय" अशा कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सागर कारंडेने आजवर अनेक मराठी चित्रपट, नाटक यांमध्ये काम केले आहे. अनेक पुरस्कार सोहळ्यात तो आपल्या हास्याने चाहत्यांना आणि कलाकारांना खूप हसवतो. सागर कारंडेच्या आगामी प्रोजेक्टसाठी चाहते कायमच आतुर असतात. सागर कारंडे कोणत्याही भूमिकेत जीव ओततो आणि प्रेक्षकांना खळखळवून हसवतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा

बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

Gavar Side Effects : गवार खाणं 'या' लोकांसाठी ठरू शकत धोकादायक! 'ही' ६ कारणे वेळीच घ्या जाणून

SCROLL FOR NEXT