Bigg Boss 4 Contestant Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Season 4: नॉमिनेशनचा वाद विकोपाला; पहिल्याच दिवशी स्पर्धकांमध्ये वादाची ठिणगी...

चौथ्या पर्वाची थीम जरी 'ऑल इज वेल' असली तरी पहिल्याच दिवसापासून बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: कलर्स मराठीवर बिग बॉसच्या चौथ्या पर्वाला (Bigg Boss Season 4 ) २ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली. यावेळी कोण बिग बॉसच्या घरात सर्वात जास्त धुडगूस घालणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अतिशय वादग्रस्त रिअॅलिटी शो (Reality Show) म्हणून 'या' शोची ओळख आहे. नेहमीच कोण ना कोणतरी वादग्रस्त ठरतो. या पर्वाची थीम जरी 'ऑल इज वेल' (All Is Well) असली तरी पहिल्याच दिवसापासून बिग बॉसच्या घरात खटके उडायला सुरुवात झाली आहे.

बिग बॉसने पहिल्याच दिवशी स्पर्धकांसोबत चाहत्यांनाही चांगलाच धक्का दिला आहे. पहिल्याच दिवशी शो मधून चार स्पर्धक बाहेर गेलेले पाहायला मिळाले. स्पर्धकांनी घरात प्रवेश करताना प्रत्येकाला वेगवेगळ्या रंगाचे बॅण्ड दिले असून त्या बॅण्डमुळे त्यांच्यात एकूण चार ग्रुप तयार झाले होते. त्यात स्पर्धकांना लाल, पिवळा, निळा आणि जांभळा अशा चार रंगाचे बॅण्ड देत ग्रुप तयार केले होते. सदस्यांनी आपल्या ग्रुपमधील एका सदस्याला बहुमताने बिग बॉसच्या घरातील निरुपयोगी सदस्य म्हणून घोषित करायचे होते. या टास्कदरम्यान अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेला.

अपूर्वाने प्रसादचे नाव घेत आपले निर्भिड मत मांडले, पण ते मत प्रसादला पटले नसून त्यांच्यातील मत- मतांतरे स्पष्टपणे दिसून आले. हा कुस्तीचा खेळ नव्हे आणि तुला असं का वाटतं की तू (योगेश जाधव) त्याच्यापेक्षा उत्तम आहेस? या अपूर्वाच्या विधानावर प्रसादने मत मांडले की, हा कुस्तीचा खेळ नाहीये. मग यावरून अपूर्वा प्रसादला थांबवत म्हणते, तू मला बोलू देणार आहेस का? की स्वतः एकटाच बोलणार आहेस? असाच त्या दोघांचा वाद पुढे वाढतच गेला.

तसेच अपूर्वा- प्रसाद नंतर नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असणारा किरण माने आणि त्रिशूल मराठे मध्येही वाद झाला होता. कोणत्या निरुपयोगी सदस्याचे नाव द्यावे याविषयी ते एकमेकांशी बोलत होते. तेव्हाच त्रिशूल मराठे त्यांच्या गटातून किरण माने यांचे नाव देण्याचे सुचवतो. त्यावेळी तो म्हणतो, मला वाटतं किरण सर, कारण बाकी आम्ही सर्व तरुण आहोत.” त्यावर लगेचच किरण माने त्याला लगेच प्रत्युत्तर करतो, अरे मग मी काय म्हातारा आहे काय? असाच वाद काहीसा यांचाही पूढे वाढत गेलेला दिसतो. आता पुढे काय होईल व हा खेळ किती रंगतदार होईल हे पाहण्यास मज्जा येणार आहे.

या स्पर्धकांतील वाद-विवाद पहिल्याच दिवशी इतका विकोपाला गेला आहे. स्पर्धेत जस जसे वेगवेगळे टास्क समोर येतील त्यात प्रत्येक स्पर्धकांमध्ये वेगवेगळे तंटे पाहायला मिळतील. सध्या थीम जरी ' ऑल इज वेल' असली तरी बिग बॉसच्या घरात आलबेल काही दिसत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठीच्या मुद्द्यावर शिंदे गटात फूट, निरुपम मराठीद्वेष्ट्या भय्यांच्या पाठीशी, संतापलेल्या मनसैनिकांची निरुपमांच्या गाडीवर दगडफेक

बेंजामिन नेतान्याहू यांना ट्यूमर; इराणसोबतच्या हाय-व्होल्टेज चर्चेआधी पंतप्रधानांचा मेडिकल रिपोर्ट समोर; जगभरात खळबळ

Maharashtra News Live Update: आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं

Sev puri chutney recipe: शेवपुरीसाठी स्ट्रीट स्टाईल चटपटीत तिखट चटणी कशी तयार कराल?

भाजपच्या मोर्चात गिरीश महाजनांवर भडकलेल्या महिलेविरोधात झेन सदावर्ते मैदानात; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT