Veena Jagtap New Serial Saam Tv
मनोरंजन बातम्या

Veena Jagtap New Serial: बिग बॉस फेम अभिनेत्री झळकणार योगयोगेश्वर जय शंकर मालिकेत

Veena Jagtap New Tv Serial : खूप दिवसांनी वीणा जगताप पुन्हा मालिका विश्वात पदार्पण करणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Veena Jagtap In Yogyogeshwar Jai Shankar Serial

मराठी टिव्ही मालिकांमधून अभिनेत्री वीणा जगताप घराघरात पोहचली. वीणा जगताप नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. वीणाला खरी ओळख ही बिग बॉसमधून मिळाली. तर खूप दिवसांनी वीणा जगताप पुन्हा मालिका विश्वात पदार्पण करणार आहे.

वीणा जगताप लवकरच 'योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठीवरील 'योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेने खूप कमी वेळात प्रसिद्धीचे शिखर गाठले आहे. शंकर महाराजांचा जो प्रवास जगाला माहित नाही. तो प्रवास या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर आता मालिकेत वीणा जगताप महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

कलर्स मराठीवर सुरू असलेल्या 'योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेत आपण शंकर महाराजांनी केलेल्या अनेक लीला बघत आहोत. अनेक भक्तांचा उद्धार त्यांनी केला तर चुकलेल्या माणसांना योग्य मार्गदेखील दाखवला. त्यांचा हाच प्रवास मालिकेतून दाखवण्यात आला आहे. बाल शंकर ते शंकर महाराज हा प्रवास प्रेक्षक उत्सुकतेने पाहत आहेत. याच मालिकेत वीणा जगताप महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

शंकर महाराजंचा पूर्ण प्रवास सुखकर करण्यासाठी माता पार्वतीने अनेक लिला केल्या. मालिकेत आपल्याला लवकरच पार्वती मातेची पाच रूपं बघायला मिळणार आहे. मालिकेत योगदायिनी पार्वती माता ही भूमिका वीणा जगताप साकारणार आहे.

मालिकेविषयी बोलताना वीणा म्हणाली,"माझ्यासाठी ही भूमिका खूप आव्हानात्मक आणि उत्सुकतेची होती. मी पहिल्यांदाच देवी रुपात होऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे. देवीची वेगवेगळी रुपे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे सर्व माझ्यासाठी खूपच कठीण होतं. एकतर असं पात्र साकारण्याची ही पहिलीच वेळ होती. बघताना खूप सोपं वाटतं आपल्याला पण ते प्रत्यक्षात साकारणं तितकंच अवघड होतं.

मला तयार व्हायलाही खूप वेळ लागायचा. मला पहिल्यांदा खूप भीती वाटतं होती जमेल की नाही. परंतु मी भाग्यवान समजते की, मला हि संधी मिळाली. मला खात्री आहे प्रेक्षकांना देखील नक्की आवडेल."

वीणा जगताप नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. परंतु बऱ्याच दिवसांनी वीणा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. वीणा याआधी 'राधा प्रेम रंग रंगली', 'आई माझी काळूबाई', 'बिग बॉस'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा घसरले; १० तोळ्यामागे २९,४०० रुपयांची घसरण, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्री ४१ व्या वर्षी होणार आई, थाटात पार पडले डोहाळे जेवण | PHOTOS

Maharashtra Live News Update : धाराशिवात शेतकरी दुहेरी संकटात

भोंदू खरातचे काळे कारनामे संपेना! राजकीय नेत्यांना लावला लाखोंचा चुना; १ किलो मधाची बाटली ९ लाखांना विकायचा

RBI Rules: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! ऑनलाइन पेमेंटच्या नियमात केले बदल; तुमच्यावर काय होणार परिणाम? वाचा

SCROLL FOR NEXT