Tejaswini Pandit SAAM TV
मनोरंजन बातम्या

Tejaswini Pandit: महाराष्ट्र हरलास तू ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी पोस्ट, म्हणाली...

Maharashtra Assembly Election Results 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी केलेली पोस्ट चर्चेत आहे. नेमकं ती काय बोली जाणून घ्या.

Shreya Maskar

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल (Maharashtra Assembly Election Results 2024) काल म्हणजे (23 नोव्हेंबर )ला लागला. तर २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान पार पडले. या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने विजय मिळवला आहे. मात्र राज ठाकरेंना (Raj Thackeray) या निवडणुकीत यश मिळाले नाही.

निकालानंतर प्रत्येकजण आपली मते मांडताना दिसत आहे. सर्वसामान्य नागरिक असो वा कलाकार सर्वजण आपली मते आणि प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत.

महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर आता अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आपले मत मांडले आहे. तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. तेजस्विनी राज ठाकरेंसाठी ही पोस्ट केली आहे. ही पोस्ट महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निकाला संबंधित आहे.

तेजस्विनीने पोस्टमध्ये लिहिलं की, "विजयी उमेदवारांचं अभिनंदन ! कोण? कसं ? आणि काहीजण का नाही हे अनुत्तरीत राहिल, त्यांच्या micro management ला १००/१०० पण तरीही... राजसाहेब ठाकरे #एकनिष्ठ #सदैवसोबत आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तसेच या पोस्टवर अनेक कमेंट्स येत आहेत.

तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) ही मराठी मनोरंजन सृष्टीतील मोठी अभिनेत्री आहे. तिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तेजस्विनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. वेगवेगळ्या विषयांवर ती आपली मते ठामपणे मांडते. तेजस्विनी स्पष्टवक्ती आहे. ती कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसी कनेक्ट असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियाची धमकी| VIDEO

Eknath shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

SCROLL FOR NEXT