Tejashri Pradhan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Tejashri Pradhan : "एक जिंदगी मेरी…", तेजश्री प्रधानची हिमाचल ट्रिप, पाहा VIDEO

Tejashri Pradhan Himachal Pradesh Trip : मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधानने नुकतीच हिमाचल प्रदेशाची सफर केली आहे. तिच्या ट्रिपचा खास व्हिडीओ तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Shreya Maskar

'होणार सून मी ह्या घरची' मालिकेमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) सध्या भटकंती करत आहे. तिने आजवर अनेक हिट मालिका केल्या आहेत. तिच्या भूमिका खूप गाजल्या आहेत. ती टीव्हीची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाने आणि शांत स्वभावाने तिने चाहत्यांना वेड लावले आहे. तेजश्री प्रधानने नुकतीच हिमाचलला (Himachal Pradesh ) फिरायला गेली होती.

तेजश्री प्रधानच्या हिमाचल प्रदेशाच्या ट्रिपचे फोटो आणि छोटे व्हिडीओ ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत होती. मात्र नुकताच तिने या ट्रिपचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त फिरताना, आनंद घेताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांती आणि समाधान पाहायला मिळत आहे. तेजश्रीने हिमाचलमधील गुशैनी या ठिकाणाची सफर केली आहे.

तेजश्रीने ट्रिपच्या व्हिडीओला एक खास कॅप्शन दिलं आहे. तेजश्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "एक जिंदगी मेरी…मै जीना पूरी तरह...आनंदी आयुष्य..." तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तसेच तिने व्हिडीओला हटके गाणे देखील लावले आहे. तिने व्हिडीओला 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटातील "एक जिंदगी मेरी…मै जीना पूरी तरह..." हे गाणे दिले आहे. तिने या ट्रीपला काय केले, कुठे फिरायला गेली याची छोटी झलक व्हिडीओतून दाखवली आहे.

व्हिडीओमध्ये तेजश्री हिमाचलच्या डोंगर, पर्वत रांगा, नदी, फुलांची बागांमधून मनसोक्त फिरताना दिसत आहे. नदी किनार ती स्वतःसोबत वेळ घालवताना दिसत आहे. तेजश्री प्रधानने अलिकडेच 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सोडली. त्यामुळे चाहते आता तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ४०० कोटींची जमीन ५६ कोटींना देण्याचा घाट, वरळीतील भूखंडाच्या भाडेपट्ट्यावरून वाद

Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेट करायचेय? नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी लागतील ही कागदपत्रे

District Bank Elections: सुप्रीम कोर्टाचा सहकार सम्राटांना मोठा धक्का, २० दिग्गज नेत्यांवर अपात्रतेची टांगती तलवार? यादीत कुणाची नावं?

Satin Silk Saree: महिलांसाठी सॅटिन सिल्क साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न नक्की ट्राय क

चिनाब पुलामुळे काश्मीरच्या विकासाला गती; रेल्वे संपर्कातून पर्यटन आणि व्यापाराला चालना

SCROLL FOR NEXT