Marathi Actress Religious Conversion Incident Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Actress: 'बायबल के बारे में बात करनी…'; बोरवलीच्या बाजारात अभिनेत्रीसोबत घडला संशयास्पद प्रकार, VIDEO व्हायरल

Marathi Actress Religious Conversion Incident: मराठी अभिनेत्री स्वाती देवलने बोरिवलीत घडलेला संशयास्पद प्रकार उघड केला. ‘बायबल’च्या नावाखाली संवादाचा प्रयत्न करणाऱ्यामुलींचा प्रकार तिने सोशल मीडियावर सांगितला आहे.

Shruti Vilas Kadam

मराठी अभिनेत्री स्वाती देवल हिच्यासोबत बोरिवली परिसरात घडलेला एक धक्कादायक प्रकार सध्या चर्चेत आला आहे. अभिनेत्रीने स्वतःचा अनुभव सोशल मीडियावर शेअर करत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

स्वाती देवलने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की, नमस्कार मी स्वाती देवल, मला एक गोष्ट सांगायची आहे. लहानपणी आपण शाळेत ऐकलं होतं, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. खरोखरंच आपला देश असा आहे की, या देशात अनेक धर्म, जात आणि पंथाचे लोक राहतात. अगदी गुण्यागोविंदाने, एकत्र आणि प्रेमाने राहतात. पण असं आपल्याला वाटत होतं. आता बऱ्याच गोष्टी बदलायला लागल्या आहेत. टीव्हीवरील बातम्या, अनेक प्रसार माध्यमांमधून बऱ्याच गोष्टी कानावर येत असतात. वाईट कर्म करणारी लोक आपल्या आजूबाजूला आहेत, हे आपल्याला दिसत असतं. पण, या गोष्टी दुसरीकडे घडत असतात, आपल्यापर्यंत येत नाहीत, तोपर्यंत आपल्याला त्याची झळ पोहोचत नाही... पण माझ्याबरोबर एक घटना घडली.

स्वाती देवल पुढे म्हणाली, बोरिवली (पश्चिम) इथल्या इंद्रप्रस्थ आणि मोक्ष प्लाझा परिसरात मी खरेदीसाठी गेले होते. यावेळी एका अनोळखी तरुणीनं मला गाठलं. ती मला म्हणाली, मॅम मला तुमच्याशी बोलायचंय, अर्थात तिनं हे हिंदीत विचारलं. त्यावर मी तिला क्या? असं म्हटलं. तर ती म्हणाली, आपसे बायबल के बारें में बात करनी थी, क्या आप बायबल के बारें में जानना चाहोगे मुझे आपसे बात करनी है. त्यावर मी तिला मुझे आपसे कुछ बात नही करनी, धन्यवाद. असं म्हटलं आणि मी तिथून निघून आले.

मी तिथून पुढे गेले, तरी माझ्या डोक्यात विचार सुरू होता की, ही बाई अचानक असं का विचारतेय? चांगल्या घरातली मुलगी, साधारण 28-30 वयोगटातली... माझ्या डोक्यात सतत विचार सुरू होता की, का हिनं मलाच विचारलं? मी मागे वळून पाहिलं तर ती माझ्यावर लक्ष ठेवून होती आणि माझ्याच आसपास घिरट्या घालत होती. मी रागानं तिच्याकडे पाहिलं आणि रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला गेले रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनं मी तिच्यावर गपचूप लक्ष ठेवायला सुरुवात केली. मला असं दिसलं की, ती काही बायकांना थांबवून त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती. नंतर बऱ्याच वेळानं ती आणखी एका मुलीला भेटली. ती मुलगीसुद्धा अशीच सगळ्यांना भेटून येत होती. मग त्या दोघी एकमेकींशी बोलल्या. मी त्यांचा व्हिडीओ शूट केला नाही, मग माझ्या लक्षात आलं की, हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे

 अभिनेत्री स्वाती देवल हिनं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "सावधान, काळजी घ्या, फसू नका. अशा लोकांशी बोलू नका. तुम्ही तुमच्या मतांशी, विचारांशी, हिंदुत्वाशी आणि तुमच्या धर्माशी एकनिष्ठ राहा. तुम्ही आपले आहात म्हणून ही गोष्ट सांगितली. जय भवानी, जय शिवाजी

स्वाती देवल ही मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री असून ‘माझी तुझी रेशीमगाठ’ आणि ‘लक्ष्मी निवास’ सारख्या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. सध्या तिच्या या व्हिडिओमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Rahu-Ketu : चांदीच चांदी होणार! नशीब पलटणार, या 3 राशींचं नशीब अचानक चमकणार

LDL cholesterol: कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य असूनही हृदय धोक्यातच; तुमचं LDL-C लक्ष्य किती असायला हवं?

Maharashtra News Live Update : चंद्रपुरात गणेश विसर्जनाला सुरुवात

Lalbaugh Raja : लालबागचा राजाच्या मंडपाजवळ मोठी दुर्घटना! ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Late Dinner: रोज रात्री उशिरा १०-११ वाजता जेवता? वेळीच बदला ही सवय, शरीरावर होतील 'हे' 7 परिणाम

SCROLL FOR NEXT