Sonali Kulkarni And Prathana Behre Social Media Post  Instagram/ @sonalee18588
मनोरंजन बातम्या

Sonali Kulkarni: सोनालीच्या आयुष्यातील 'ही' सिक्रेट नवदुर्गा

सोनालीने प्रार्थनाबद्दल आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भरभरुन लिहीले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सिनेसृष्टीतील बरेच अभिनेते- अभिनेत्री (Marathi Celebrity) चांगले मित्र मैत्रिण आहेत. तर काहींचा काही कारणास्तव दुरावाही आहे. मराठी सिनेसृष्टीतही असे काही कलाकार मंडळी आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) सध्या अनेक चित्रपटांमुळे, रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. तसेच तिच्या लग्नाचीही खूप चर्चा रंगली होती. त्यातल्या त्यात तिच्या लग्नाचे कुतूहल तिच्या मित्रमंडळींसोबतच चाहत्यांनाही खूप होते. तिच्या लग्नात जास्त मित्र मंडळी दिसून आले नाहीत. तिच्या लग्नाचे काही खास क्षण मराठी ओटीटीवरही प्रदर्शित करण्यात आले होते.

तिच्या लग्नात काही ठिकाणी अगदी ठळकपणे समोर आली होती ती प्रार्थना बेहरे. या दोघींनीही 'मितवा' चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यात त्यांच्यासोबत स्वप्निल जोशीही होता. चित्रपटात फ्रेंडशिपचा लव्ह ट्रँगल पाहायला मिळत होता. तेव्हा पासून त्यांची मैत्री दिसत आहे. सोनालीने प्रार्थनाबद्दल आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भरभरुन लिहीले आहे.

सोनालीने प्रार्थनाविषयी पोस्टमध्ये लिहीलंय की, 'माझी मराठी चित्रपटसृष्टीतील बेस्ट फ्रेंड प्रार्थना बेहेरे. माझी मितवा प्रार्थना बेहेरे. सुख-दु:खातली मैत्रिण. सिनेमा करणे ते बघणे, बॉयफ्रेंड ते हजबंड, मेकअप ते स्किनकेअर, फॅमिली ते फूड आणि खूप काही विषय मी जिच्याबरोबर शेअर करते अशी माझी मितवा. माझी नवदुर्गा.' सोनालीने ही पोस्ट शेअर करताना #tumpa #love #bff #navratri #bestfriends असे हॅशटॅगही वापरले आहेत.

सोनालीने केलेली पोस्ट प्रार्थनानेही रिपोस्ट केली आहे. त्या पोस्टवर प्रार्थना कमेंट करत बोलते, 'माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे सोना'. मराठीतील या आघाडीच्या अभिनेत्रींच्या फोटोवर चाहतेही भरभरुन कमेंट्स करत आहेत.नवरात्रीचे निमित्त साधत सोनालीने तिच्या आयुष्यातील दुर्गाचा फोटो शेअर केला आहे. तिच्या आयुष्यातील प्रार्थनाचे स्थान खूप जवळचे आहे. याआधी सोनालीने आई, सासूबाई, आजी आणि जवळची मैत्रिणीसाठी खास पोस्ट्स शेअर केल्या आहेत.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT