Sonalee Kulkarnee Viral Dance Instagram
मनोरंजन बातम्या

Sonalee Kulkarnee: अमरावतीच्या अंबादेवी मंदिरासमोर सोनाली कुलकर्णीने घातला गोंधळ, व्हिडीओ झालाय तुफान व्हायरल

सोनाली कुलकर्णीने एका मंदिराबाहेर गोंधळ घातला आहे.

Chetan Bodke

Sonalee Kulkarnee Viral Dance: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिच्या अभिनयासोबतच कातील करणाऱ्या फोटोंमुळे देखील ती चर्चेत असते. सध्या सोनाली महाराष्ट्र दर्शन करते. गेल्या अनेक दिवसांपासून ती महाराष्ट्रातील वेगवेगळ्या देवस्थानाचे दर्शन आपल्या चाहत्यांना करत आहे.

‘महाराष्ट्र टुरिझम’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत सोनाली सध्या अमरावतीत आहे. अमरावतीतील खाद्यसंस्कृती आणि वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती या व्हिडीओतून तिने दिली आहे. याबरोबरच सोनालीने अमरावतीमधील सुप्रसिद्ध अशा अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. विशेष म्हणजे यावेळी तिने मंदिरासमोर गोंधळही घातला.

नुकताच सोनालीने आपल्या चाहत्यांसोबत अमरावतीतील एपिसोडचा टीझर शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा टीझर बराच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शन दिले की, “अंबादेवी मंदिरासमोर गोंधळींसोबत उत्स्फुर्तपणे गोंधळात सामील होताना…”. या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या असून हा व्हिडीओ बऱ्याच जणांना आवडला आहे.

सोनाली गेल्या वर्षी ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या वर्षात सोनाली ‘ताराराणी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही? कारण आलं समोर

Maharashtra Live News Update: जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच, पाच जणांना घेतला चावा

Hruta Durgule: ‘आली मोठी शहाणी’च्या गोव्यातील चित्रीकरणाचा श्रीगणेशा ! हृता दुर्गुळे - सारंग साठ्ये पहिल्यांदाच एकत्र

Mumbra Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघातात मोठी कारवाई, २ इंजिनिअर आणि अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

Garlic Chutney: वरण भातासोबत पापड नको, फक्त ५ मिनिटांत तयार करा झणझणीत लसूण आणि पुदिना चटणी

SCROLL FOR NEXT