Sanskruti Balgude Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sanskruti Balgude: संस्कृती बालगुडे बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री, शारिब हाश्मीसोबत साकारणार महत्वाची भूमिका

Sanskruti Balgude Will Debut In Bollywood: मराठीतील अनेक सेलिब्रिटी हे बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकत आहेत. बॉलिवूड गाजवणारे हे मराठी सेलिब्रिटी बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करत असून बॉलिवूडमध्ये मराठीचं नाव मोठं करताना दिसत आहेत.

Priya More

Sanskruti Balgude Movie:

मराठी सिनेसृष्टीमध्ये नाव कमावल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी आपला मोर्चा बॉलिवूडकडे (Bollywood) वळवला आहे. मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचे बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता हिंदी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आता ते सज्ज झाले आहेत. सई ताम्हणकर (Saie Tamhankar), अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), प्रिया बापटनंतर (Priya Bapat) आता आणखी एक मराठमोळी अभिनेत्री बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) लवकरच आता बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनय करताना दिसणार आहे.

मराठीतील अनेक सेलिब्रिटी हे बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकत आहेत. बॉलिवूड गाजवणारे हे मराठी सेलिब्रिटी बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करत असून बॉलिवूडमध्ये मराठीचं नाव मोठं करताना दिसत आहेत. सई ताम्हणकर , अमृता खानविलकर , प्रिया बापट , वैभव तत्ववादी, गिरिजा ओक यांच्या बॉलिवूड पदार्पणानंतर आता संस्कृती बालगुडे देखील बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. आता आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून ती हिंदी प्रेक्षकांचे देखील चांगलेच मनोरंजन करणार आहे.

संस्कृती बालगुडेची अभिनय, नृत्य आणि अनेक कलांची आवड जोपासणारी अभिनेत्री अशी ओळख आहे. संस्कृती लवकरच एका बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेता शारिब हाश्मीसोबत ती या हिंदी- इंग्रजी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. हा बॉलिवूड प्रोजेक्ट नक्की काय असणार आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. पण संस्कृती लवकरच अधिकृत माहिती देणार आहे. आपला दमदार अभिनय, फॅशन सेन्स, डान्स यामुळे संस्कृती नेहमीच चर्चेत राहते. आता ती तिच्या बॉलिवूड एन्ट्रीमुळे चर्चेत आली आहे.

दरम्यान, मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने आतापर्यंत 'हंटर', 'मिमी' आणि 'भक्षक' या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने 'लुटेरा' या वेबसीरिजच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यासोबत तिने 'राझी', 'मलंग' या चित्रपटात काम केले. अभिनेत्री प्रिया बापटने देखील बॉलिवूडमध्ये दमदार अभिनय केला आहे. तिने 'रफुचक्कर', 'सिटी ऑफ ड्रीम्स' या चित्रपटामध्ये काम केले आहे. तर वैभव तत्ववादीने 'आर्टिकल 370', 'बाजीराव मस्तानी', 'हंटर', 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT